मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी संकट टळलं नाही, देशात कोरोनाबाधितांचा आकडा ७५ लाखांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे असं सातत्याने प्रशासन सांगत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
सोमवारी सकाळी मनसे नेते अमित ठाकरे Amit Thackeray यांना वांद्रे येथील लिलावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या २ दिवसांपासून अमित ठाकरेंना ताप जाणवत होता, प्रामुख्याने त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे, मलेरिया चाचणीही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितले आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अमित ठाकरे यांनी कोरोना काळात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न त्यांनी राज्य सरकारकडे मांडल्या होत्या, त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळानेही अमित ठाकरेंची भेट घेऊन अपुऱ्या वेतनाबाबत समस्या मांडली होती, त्यानंतर अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना याबाबत पत्र लिहिलं होतं, आरे येथील मेट्रो कारशेड बाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचं अमित ठाकरेंनी स्वागत केले होते