Join us

मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या शिळेवर मराठी भाषेला डावलल्याने मनसेकडून राज्य सरकारचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2019 2:25 PM

मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन नवीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात शनिवारी करण्यात होते.

मुंबई: मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन नवीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात शनिवारी करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाच्या उद्धाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याने मनसेने राज्य सरकारचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुंबईच्या मेट्रोच्या प्रकल्पाच्या शिळेवरच मराठी भाषेला डावलल्याने सरकारचा निषेध करत सांगितले की, मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी नाही, मात्र काहीही संबंध नसताना बाहेरची हिंदी भाषा असल्याने महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल असे म्हणत राज्य शासनाचा निषेध केला आहे.

मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन नवीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईच्या दौऱ्यात उपस्थितांशी मराठीतून संवाद साधत  ‘नमस्कार मुंबईकर’ असे म्हणत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर देखील केला होता. तसेच २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मुंबईतील कामांचा शुभारंभ करण्यात आला असून, आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सुमारे १०० लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाईल.आज जितके लोक उपनगरीय लोकल रेल्वेतून प्रवास करतात तितकेच मुंबईत मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर मेट्रो रेल्वेतून प्रवास करू शकतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता.

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेसंदीप देशपांडेदेवेंद्र फडणवीसमेट्रोमहाराष्ट्र