Raj Thackeray Ayodhya Visit: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर मनसेकडून ठिकठिकाणी 'चला अयोध्येला' अशी बॅनरबाजी करण्यात येत आहे. मुंबईत दादर परिसरात मनसेकडूनराज ठाकरेंच्याअयोध्या दौऱ्याबाबतचे पोस्टर लावण्यात आले असून सर्व नागरिकांना राज यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर येण्यासाठीचं आवाहन केलं आहे. दादरमधील शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर मनसेने राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची माहिती देणारा बॅनर लावला आहे.
बॅनरवर राज ठाकरे यांचा भगवाधारी फोटो पाहायला मिळतो. तसंच 'राज तिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगावाधारी', असाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय 'चला अयोध्येला, आम्ही चाललोय तुम्हीही चला', असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचालीला सुरुवात केली असून अयोध्या दौरा त्याचाच एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्या शिवसेनेसाठी पर्याय बननण्याची रणनीती मनसेकडून आखली जात असल्याचं बोललं जात आहे.
अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून १० ते १२ रेल्वेची मागणीराज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी मनसेमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. पक्षाकडून रेल्वेकडे १० ते १२ रेल्वेची मागणी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नाशिक, नागपूर या ठिकाणाहून १० ते १२ रेल्वेगाड्या बुक करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.