Presidential election 2022: “नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा…!”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:12 PM2022-07-13T14:12:38+5:302022-07-13T14:14:11+5:30

Presidential election 2022: आता काहीच पर्याय उरलेला नाही म्हटल्यावर नाईलाजाने दिलेले समर्थन!; मनसेचा शिवसेनेला टोला

mns raju patil taunt shiv sena uddhav thackeray and sanjay raut over presidential election 2022 | Presidential election 2022: “नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा…!”

Presidential election 2022: “नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा…!”

googlenewsNext

मुंबई: राज्यात एकीकडे सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना दुसरीकडे देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election 2022) रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, यावरून आता संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या असून, भाजपने उद्धव ठाकरे यांना धन्यवाद दिले असताना मनसेने टोला लगावला आहे. 

शिवसेनेना कधीच कोत्या मनाने वागलेली नाही. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची संधी मिळत आहे तर आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, अशी भावना खासदारांनी व्यक्त केली होती. त्याचा सन्मान करत शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केले आहे. यामधून त्यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. 

अगला राष्ट्रपती हमारा होगा…!

आता काहीच पर्याय उरलेला नाही म्हटल्यावर नाईलाजाने दिलेले समर्थन! तरी नशीब उरलेल्या राखीव खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, “अगला राष्ट्रपती हमारा होगा…!”, असा टोला राजू पाटील यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्षरित्या लगावला आहे. तसेच #विश्व_प्रवक्ता असा हॅशटॅगही दिला आहे. 

दरम्यान, शिवसेनेच्या खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंवर दबाव आणल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्यावर खासदारांनी कोणताही दबाव आणलेला नाही. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे आमच्या पक्षातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांनी एका आदिवासी उमेदवाराला देशाचे राष्ट्रपतीपद भूषवण्याची संधी मिळत असल्यामुळे आपण पाठिंबा द्यायला हवा अशी विनंती माझ्याकडे केली. शिवसेनेने याआधीही पक्षीय अभिनिवेशन बाजून ठेवून प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 
 

Web Title: mns raju patil taunt shiv sena uddhav thackeray and sanjay raut over presidential election 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.