Sandeep Deshpande : "दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या"; मनसेचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:01 AM2022-04-07T10:01:30+5:302022-04-07T10:18:59+5:30

MNS Sandeep Deshpande And Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या भेटीवर आता मनसेने प्रतिक्रिया दिली आहे.

MNS Sandeep Deshpande Reaction over sharad pawar and pm narendra modi meeting at delhi | Sandeep Deshpande : "दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या"; मनसेचा खोचक टोला

Sandeep Deshpande : "दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या"; मनसेचा खोचक टोला

googlenewsNext

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे बुधवारी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक आणि पाठोपाठ शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीने आणलेली टाच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीय मूल्य प्राप्त झाले होते. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. यावरून आता मनसेने जोरदार निशाणा साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या भेटीवर आता मनसेने प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी "दिल्लीत काल 'माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा' अशा आर्त हाका ऐकू आल्या" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "1773 साली "काका मला वाचवा"अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याशा वेगळ्या संदर्भात "माझ्या पुतण्याला वाचवा"अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या" असं म्हणत संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केला आहे. 

"इतिहास आपण पाहिला तर 1773 साली शनिवारवाड्यात काका मला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या होत्या. 2022 साली माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या. ईडीपासून माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या. त्यामुळे कधी काका मला वाचवा असतं तर कधी माझ्या पुतण्याला वाचवा असं असतं. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते" असं  एबीपी माझाशी बोलताना संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधानांशी केलेल्या चर्चेदरम्यान पवार यांनी उपस्थित केलेल्या तीन मुद्द्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राऊत यांच्या संपत्तीवर आलेली टाच, विधान परिषदेत आमदारांच्या नियुक्तीला राज्यपालांकडून होत असलेला विलंब आणि लक्षद्वीपमध्ये राज्यपाल प्रफुल्ल कोडा पाटील यांचा मनमानी कारभार हे तीन मुद्दे पवारांनी उपस्थित केले. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत फूट पडणार नाही, उलट अधिक मजबुतीने सरकार चालवले जाईल, असा संदेशच पवार यांनी या भेटीतून दिल्याचे बोलले जाते. 
 

Web Title: MNS Sandeep Deshpande Reaction over sharad pawar and pm narendra modi meeting at delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.