'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 11:44 AM2020-03-06T11:44:10+5:302020-03-06T11:53:39+5:30

मुख्यमंत्री 7 मार्चला अयोध्येत जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. 

mns sandeep deshpande slams CM uddhav thackeray over ayodya SSS | 'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. 'अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी...'मुख्यमंत्री 7 मार्चला अयोध्येत जाणार आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला हा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. त्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री 7 मार्चला अयोध्येत जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे. 

'अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी...' असं म्हणत मनसेने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी 'लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या सांगण्यावरून सत्तेला लाथ मारून चौदा वर्ष वनवास भोगला आणि भरताला राज्य दिले. पण भरताने संधीसाधू पणा न करता रामचंद्रांच्या पादुका ठेवून राज्य केले. असा इतिहास असलेल्या अयोध्येला जाताय तेव्हा जाताना जनाची नाही किमान मनाची तरी....शुभेच्छा' असं ट्विट केलं आहे. शुक्रवारी (6 मार्च) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी हे ट्विट केलं आहे. 

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले होते. तसेच अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. हा दौरा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित होता. मात्र. राज्यात सत्तास्थापनेस विलंब होत असल्याने हा दौरा लांबणीवर पडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे 7 मार्च रोजी असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येला भेट देणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बजेट 2020 Live: अजित पवारांकडून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

महाराष्ट्र सीआयडी वेबसाईट हॅक!

एका मिनिटात ४ लाख कोटी स्वाहा; येस बँक, कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला

China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'

८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द

महाविकास आघाडी सरकारच्या विविध मंत्र्यांनी १०० दिवसांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

 

Web Title: mns sandeep deshpande slams CM uddhav thackeray over ayodya SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.