Maharashtra Politics: “अजब आहे, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे, महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून...”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 01:53 PM2022-10-15T13:53:14+5:302022-10-15T13:54:00+5:30

Maharashtra News: शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी दिली जात असल्याची टीका करण्यात आली आहे.

mns shalini thackeray criticizes shiv sena kishori pednekar over maha prabodhan yatra | Maharashtra Politics: “अजब आहे, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे, महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून...”

Maharashtra Politics: “अजब आहे, माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे, महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून...”

googlenewsNext

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, दौरे, सभा यांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निष्ठा यात्रा, शिवसंवाद यात्रेनंतर आता महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अनुपस्थितीवरून मनसेने खोचक शब्दांत टोला लगावला आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘मशाल’ हे पक्षचिन्ह दिले आहे. नवीन नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रबोधन यात्रेत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अद्यापही दिसल्या नाहीत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही किशोरी पेडणेकरांची खिल्ली उडवली आहे. दुसरीकडे, किशोरी पेडणेकरांच्या अनुपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

मूळ सैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी 

शालिनी ठाकरे यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका केली आहे. शिल्लक सेनेकडून मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्यांना संधी दिली जात असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. किशोरी पेडणेकरांचा थेट उल्लेख न करता ही टीका करण्यात आली आहे. शालिनी ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत त्यांना बोलावले नाही, म्हणून त्यांनी पक्षप्रमुखांकडे तक्रार केली. पण काहीही उपयोग झाला नाही. मूळ शिवसैनिकांवर अन्याय करून उपऱ्याना नवीन शिल्लक सेनेकडून संधी दिली जाते. हे अजब आहे, अशी टीका करण्यात आली आहे. 

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपसह शिंदे गट एकमेकांसमोर आले आहेत. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. यातच उद्धव ठाकरेंना दिलेल्या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेतला असून, यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: mns shalini thackeray criticizes shiv sena kishori pednekar over maha prabodhan yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.