“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 10:08 PM2021-08-31T22:08:43+5:302021-08-31T22:09:57+5:30
किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेवर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही ठाकरे सरकारने मंदिरे न उघडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरे उघडली नाहीत, तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणखी काही करा, पण आमचा नाद करू नका, असे प्रत्युत्तर दिले होते. मात्र, मनसेकडून आता यावर पलटवार करण्यात आला असून, सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. (mns shalini thackeray replied kishori pednekar over raj thackeray criticism)
“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला
घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा आमचा नाद करू नका. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो, असे दाखवतात. मात्र, भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला होता. यावर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पलटवार केला आहे.
“देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका”; भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात
घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही
नाद करण्यासाठी अगोदर स्वतःची हिंदुत्वाची भूमिका ठाम असावी लागते, पण सत्ता मिळाल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बद्दलणाऱ्याची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही...!!!, असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.
नाद करण्यासाठी अगोदर स्वतःची हिंदुत्वाची भूमिका ठाम असावी लागते, पण सत्ता मिळाल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बद्दलणाऱ्याची घंटा तर निवडणूकीत जनताच वाजवल्याशिवाय राहणार नाही...!!!#नादकरापणआमचाकुठं#मुंबईमहापौर#किशोरीपेडणेकर
— Shalini Thackeray (@ThakareShalini) August 31, 2021
“सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळे यांनी वडिलांना विचारावं”; चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
सण आला की लॉकडाऊन
जनआशीर्वाद यात्रा झालेली चालली. सण आला की लॉकडाऊन. म्हणजे सणांमधून रोगराई पसरते. यांना जे हवेय तेवढे वापरायचे आणि बाकीचे बंद करुन इतर जनतेला घाबरून ठेवायचे. त्यामुळे उत्सव साजरा करा, असे सांगितले. लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जात असून, सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.