मुंबई - मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ""महाभिकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासूनच नैसर्गिक संकटे आली. गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली. सरकारपर्यंत आवाज पोहचून कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे" असं म्हणत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात" असं देखील शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"जेव्हा पासून महाराष्ट्रात हे महाभिकास आघाडी सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासूनच महाराष्ट्रात अनेक नैसर्गिक संकटे आली आहेत सोबतच लूटमार, दरोडा आणि महिला अत्याचार या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे, कित्येक प्रश्न रेंगाळले असून आश्वासनाच्या पलीकडे हे सरकार काहीही ठोस कृती करताना दिसत नाही. कोणीही सर्वसामान्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला की फक्त आश्वासनाची गाजर दाखवून वेळ मारून नेण्याचे काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना दिसतात. म्हणूनच आज आईच्या माध्यमातून या सरकारपर्यंत आवाज पोहचून कोरड्या आश्वासनाच्या पलीकडे जाऊन ठोस कृती करणारे मुख्यमंत्री दिसू दे यासाठी गाऱ्हाणे मांडत आहे" असं म्हटलं आहे.
"आई माझी अशी..हाकेला धाव ग..करतो म्हणजे काय करणारच शब्दांचा नुसताच बार गंकोरड्या आश्वासनापलीकडे नाही मिळत इथे फार गंशब्दाला जागणारे सुपर सीएम आम्हाला कधी दिसणार गं" असं शालिनी ठाकरे यांनी म्हणत जोरदार टीका केली आहे.
आणखी वाचा
- "कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम"
- "राज्यातील महाविकास आघाडीला झोपेतून जाग करण्यासाठी मनसे देवीपुढे घालणार गाऱ्हाणं"