मुंबई : महावितरणचा बहुतांशी कारभार मराठीतून केला जात नसल्याच्या मुद्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविताच प्रशासन नमले आहे. आणि कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेच्या वापराबाबत पुन:श्च सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मराठी भाषेचा वापर प्रकर्षाने करण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे निर्देश वांद्रे येथील महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयातून उर्वरित सर्व कार्यालयांना देण्यात आले आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सद्यस्थितीमध्ये महावितरणमध्ये कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. शिवाय शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे नमुद केले. या कारणात्सव सर्व संबंधित अधिका-यांनी अपरिहार्य परिस्थिती वगळता कंपनीचे दैनंदिन कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतूनच करण्यात यावे, अशा आशायाचे निर्देश महावितरण मुख्यालयातून औरंगाबाद, कल्याण, पुणे, नागपूर कार्यालयांना देण्यात आले आहेत.