Join us  

राज ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय किशोरी पेडणेकरांना फराळ गोड वाटत नाही; मनसेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 5:08 PM

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे.

मुंबई- कुणाचं अस्तित्व कुणामुळे धोक्यात येत नसतं. तुमचं अस्तित्व धोक्यात होतं असं वाटल्याने तुमच्या पक्षप्रमुखाला वेगळा पक्ष काढावा लागला. एकाबाजूला बाळासाहेब सांगतात, मी त्याचे षडयंत्र ओळखले. षडयंत्र हा शब्द बाळासाहेबांचा आहे. त्याला साथ देणारे तसेच असतात त्यामुळे त्यांना उत्तर देणे मी उचित मानत नाही. सरडा लाजेल एवढी भूमिका बदलतात अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंच्यामनसेवर निशाणा साधला आहे. 

किशोरी पेडणेकरांच्या या टीकेवर मनसेने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. "मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन" हा शब्द देवनागरी व इंग्रजीत वाचता, बोलता, लिहिता न येणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिवाळीत पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मनसेचे नाव घेतल्याशिवाय फराळ गोड वाटत नाही आहे, अशी टीका गजानन काळे यांनी केली. 

तसेच सैनिकाला मुख्यमंत्री करतो म्हणून टूमकन स्वतःच मुख्यमंत्री व बाळाला मंत्री करणारे आम्हाला शिकवणार का?, असा टोलाही उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. एमआयएम आणि समाजवादी पक्षासोबत सुध्दा युतीचे संकेत दिसायला लागले आहे. 

दरम्यान, भोंगे वाजवले, उद्दिष्ट साध्य केले. मग भोंगे बंद केले. आता पुन्हा भोंगे सुरू केले. तुम्ही लोकांना इतके गृहित धरायला लागला पण लोकांनी मनसेला गृहित धरलं आहे. तुम्ही त्यातून बाहेर येऊ शकत नाही. खोटं बोलणं हे मनसेचे काम आहे. त्या पक्षाचं नाव वेगळे आहे परंतु लोकांमध्ये प्रतिमा काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे असा घणाघात त्यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :राज ठाकरेमनसेकिशोरी पेडणेकर