‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:59 IST2025-01-16T10:58:54+5:302025-01-16T10:59:39+5:30

वरळी एनएससीआय डोम येथे रविवारी मेळावा होणार होता. मात्र, हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे.

MNS state level gathering, Raj Thackeray will guide the office bearers | ‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा मुंबईत होणार आहे. यावेळी स्वबळावर लढायची की युतीसोबत जायचे, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

वरळी एनएससीआय डोम येथे रविवारी मेळावा होणार होता. मात्र, हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर जिल्ह्यांतील महापालिका क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, नेते, महिला सेना, विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवतीर्थ निवासस्थानी नेते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी समविचारी पक्षांशी युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, पक्षात फेरबदलाचे संकेतही त्यांनी दिले होते. 

Web Title: MNS state level gathering, Raj Thackeray will guide the office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.