मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा मुंबईत होणार आहे. यावेळी स्वबळावर लढायची की युतीसोबत जायचे, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
वरळी एनएससीआय डोम येथे रविवारी मेळावा होणार होता. मात्र, हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर जिल्ह्यांतील महापालिका क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, नेते, महिला सेना, विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवतीर्थ निवासस्थानी नेते आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी समविचारी पक्षांशी युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, पक्षात फेरबदलाचे संकेतही त्यांनी दिले होते.