Join us

रात्रीच्या संचारबंदीवरून मनसेचा शिवसेनेवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने ब्रिटनमध्ये कठोर पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महापालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने ब्रिटनमध्ये कठोर पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. यावरून मनसेचा शिवसेनेवर निशाणा साधला.

सरकारच्या या निर्णयावरून मनसेने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ‘तुमची नाईट लाईफ, ही नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना,’ असे टि्वट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीच काही वर्षांपासून नाईट लाईफचा मुद्दा लावून धरला होता. शिवाय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा विषय मार्गी लावण्यात आला. या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी सरकारच्या भूमिकेवर भाष्य केले. नाईट लाईफसाठी पुढाकार घेणारे आता जनतेला मात्र पार्टी करण्यापासून रोखत आहेत, असे भाष्य देशपांडे यांनी केले.

...................