- अल्पेश करकरेमुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध मनसे पोस्टर वॉर चांगलाच रंगला आहे. त्यात आता शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या तीन चार दिवसापासून राऊत व मनसेकडून दररोज एकमेकांवर हल्लाबोल होत आहे. आज मनसेने एका जुन्या फोटोची आठवण करून देत , सामना कार्यालयात बाहेर बॅनर लावत मनसेने राऊतांना ईशारा दिला आहे.
मनसेचे प्रभादेवी आणि मोहीम येथील पदाधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सामना कार्यालयासमोर बॅनर लावत. राऊतांना जुन्या वादाची आठवण करुन दिली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज समर्थकांकडून संजय राऊत यांची गाडी फोडण्यात आली होती. तोच जुना फोटो बॅनरवर लावत. याची पुनरावृत्ती हवी का ? असा सवाल राऊत यांना विचारत राऊतावर टीका केली आहे. मनसेने लावलेल्या बॅनरमध्ये काय आहे ?तुम्ही ओवेसी कोणाला बोलता संजय राऊत तुमचा कर्कश्श भोंगा बंद करा याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्राला होतोयनाहीतर मनसे स्टाइल तुमचा भोंगा बंद करूसंजय राऊत यांची गाडी पलटी केल्याचा फोटो अन त्याच्या खाली या चे पुन्हा वृत्ती हवी का
संजय राऊत काय बोलणार ?मनसे कडून सामना कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे रोज बोलणारे खासदार संजय राऊत आता मनसेच्या या टीकेवर आणि इशाऱ्यावर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र पोलिसांनी सामना कार्यालयाबाहेर लावलेले बॅनर काढलेले आहेत