मनसे विरुद्ध शिवसेनेचा सोशल मीडियात सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 12:46 AM2019-12-05T00:46:29+5:302019-12-05T00:48:51+5:30

मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या सोशल मीडियात जोरदार लढाई सुरू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात ...

 MNS vs Shiv Sena face social media | मनसे विरुद्ध शिवसेनेचा सोशल मीडियात सामना

मनसे विरुद्ध शिवसेनेचा सोशल मीडियात सामना

Next

मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या सोशल मीडियात जोरदार लढाई सुरू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात अस्तित्वात आलेली नवी राजकीय समीकरणे तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत दोन्ही पक्षांच्या बदलेलेल्या भूमिकांवरून एकमेकांना ट्रोल करण्याचा उद्योग सुरू आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत नाराजी व्यक्त करीत सेनेला फटकारले. ‘मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या शिवसेना आयटी सेलवाल्यांनी आधी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे, भाजपने चूक केली म्हणून तुम्हीपण करणार का?’ अशा आशयाचे ट्विट सचिन देशपांडे यांनी केले. विधानसभा निवडणुकांचे निकाल व त्यानंतरच्या राजकीय नाट्यावर देशपांडे यांच्या टिपणीवर शिवसैनिकांकडून उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
अलीकडेच पर्यटन विषयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईसुद्धा उपस्थित होते. शासकीय बैठकीत सरदेसाई यांच्या उपस्थितीवर विविध घटकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. देशपांडे यांनीसुद्धा ट्विटद्वारे याबाबत आक्षेप नोंदविला. यावर शिवसेनेकडून आधीसुद्धा असे प्रकार घडत होते, असा दावा करीत देशपांडे यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. काही उत्साही मंडळींनी अमृता देवेंद्र फडणवीस या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत असल्याचे फोटो टाकून आपला मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसैनिकांनीही त्याबाबतची वस्तुस्थिती मांडत शिवसेनेवर प्रतिहल्ला चढविला.

‘सोशल’ धुलाई
शिवसैनिकांनी ट्रोलिंगचे प्रकार बंद करावेत, भाजपवर टीका करताना शिवसेनासुद्धा तोच उद्योग करीत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. सोशल मीडियातील या ट्रोलिंगमुळे गेल्या पाच वर्षांतील दोन्ही पक्षांच्या भूमिका आणि त्यातील बदलांवरून एकमेकांची यथेच्छ सोशल धुलाई सुरू आहे.

Web Title:  MNS vs Shiv Sena face social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.