मनसे स्वीकारणार शिवरायांची राजमुद्रा, पक्षाचा झेंडा बदलण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:04 AM2020-01-06T06:04:11+5:302020-01-06T06:04:29+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहुरंगी झेंड्यात बदल करण्यात येणार आहे.

MNS will accept the bhagwa, talk about changing the flag of the party | मनसे स्वीकारणार शिवरायांची राजमुद्रा, पक्षाचा झेंडा बदलण्याची चर्चा

मनसे स्वीकारणार शिवरायांची राजमुद्रा, पक्षाचा झेंडा बदलण्याची चर्चा

Next

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहुरंगी झेंड्यात बदल करण्यात येणार आहे. पक्षाकडून छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणारे, प्राधान्याने केशरी किंवा भगवा रंग असलेला नवीन ध्वज स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. याबाबत २३ जानेवारीला होणाऱ्या पक्षाच्या महामेळाव्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता मनसेतील सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत, २३ जानेवारी रोजी मनसेने मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. याच मेळाव्यात सध्याचा बहुरंगी ध्वज बदलून राजमुद्रा असलेला केशरी झेंडा स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या स्थापनेवेळीच राज यांनी झेंड्याबाबतची भूमिका स्पष्ट केली होती. मध्यभागी असलेल्या भगव्या रंगासोबत मुस्लीम आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून अनुक्रमे हिरव्या आणि निळ्या रंगाचा समावेश झेंड्यात असल्याचे तेव्हा राज यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तब्बल दशकभराच्या प्रवासात मूळ मनसे समर्थकांचा तोंडवळा सारखाच राहिला आहे. सुरुवातीचा अपवाद सोडला, तर मराठीचा मुद्दाही एका मर्यादेपलीकडे यश देऊ शकला नाही.
महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे शिवसेनेला हिंदुत्वाची बाजू घेणे अवघड होत जाणार आहे. हीच संधी साधत आपल्या मूळ विचारधारेकडे परतण्याचाही विचार यामागे असू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे काहीशी बाजूला पडली असल्याचे चित्र आहे. मोदींवर धारधार
हल्ला चढविणाºया राज ठाकरे यांची निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चांगलीच ऊठबस
होती. आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठीही राज हिरो ठरले होते. निवडणुकीनंतर नवी राजकीय समीकरणे बनली. शिवसेनेच्या नेतृत्वात आघाडीची महाराष्ट्रविकास आघाडी बनली. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी मनसेची सोबत अडचणीची बनली आहे. परिणामी, नव्या समीकरणात स्थान नसल्याने मनसेला आपल्यासाठी नवीन स्पेस बनवावी लागणार आहे.
>यापूर्वी केलेला इंजिनाच्या दिशेत बदल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी आपल्या इंजिनाच्या दिशेत बदल केला होता. झेंड्यातील संभाव्य बदलाबाबत विचारले असता, मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पक्षात झेंड्यात बदल करावा, याबाबत चर्चा मात्र सुरू आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हेच याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यांनी अद्याप याबाबतची घोषणा केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झेंड्यात समाविष्ट केली जाऊ शकते. शिवमुद्रा ही मराठी माणसाच्या अभिमानाची मुद्रा आहे.

Web Title: MNS will accept the bhagwa, talk about changing the flag of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.