Join us

Video: मोबाईल चोरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मनसेने दाखविला इंगा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:29 PM

मोबाईल नसल्याचं लक्षात येताच अर्ध्या वाटेतून परत येऊन नंदिनी आणि तिच्या मैत्रिणीने तिकीट काढणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मोबाईलबाबत विचारणा केली

मुंबई - पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल स्थानकात चोरी केल्याप्रकरणी तिकीट काउंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

मनसेच्या युवा कार्यकर्त्या नंदिनी बेलेकर या मुंबई सेंट्रल स्थानकातून तिकीट घेऊन आपल्या मैत्रिणीसोबत खारला जात होत्या. त्यावेळी नंदिनी यांच्या मैत्रिणीचा मोबाईल तिकीट काऊंटरवरच चुकून राहून गेला. मोबाईल नसल्याचं लक्षात येताच अर्ध्या वाटेतून परत येऊन नंदिनी आणि तिच्या मैत्रिणीने तिकीट काढणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यास मोबाईलबाबत विचारणा केली. मात्र आपल्याला माहिती नाही असं सांगत रेल्वे कर्मचाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. 

मात्र मोबाईल कव्हर जवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्याने नंदिनी आणि तिच्या मैत्रिणीने स्टेशनवरील सीसीटीव्ही दाखविण्याची विनंती केली. त्यानंतर आपल्याकडे मोबाईल नसल्याचा आव आणणाऱ्या त्या रेल्वे कर्मचाऱ्याजवळच मोबाईल सापडला. मोबाईलमधील सिमकार्ड रेल्वे कर्मचाऱ्याने काढून टाकले होते. यावेळी संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यास चोप दिला. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून अद्याप या प्रकरणात कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती मिळाली आहे. 

टॅग्स :मनसेरेल्वे