'खळ्ळ-खटॅक'... नाणार प्रकल्पाच्या ताडदेव येथील कार्यालयात मनसेकडून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 04:40 PM2018-04-16T16:40:57+5:302018-04-16T16:40:57+5:30
मनसे कार्यकर्त्यांनी प्रकल्पाच्या ताडदेव येथील कार्यालयात तोडफोड केली आहे.
मुंबईः महाराष्ट्रात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असा 'आवाssज' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी प्रकल्पाच्या ताडदेव येथील कार्यालयात तोडफोड केली आहे.
नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं नुकसान होईल. त्यामुळेच कोकणवासी या प्रकल्पाविरोधात आहेत. मात्र, फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,' असा थेट आरोप राज यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. 'नाणार प्रकल्पाला विरोध केल्यास हा प्रकल्प गुजरातमध्ये जाईल, अशी भीती मुख्यमंत्री दाखवतात. याचा अर्थ सगळं काही वरच्या पातळीवर ठरलेलं आहे. देशात गुजरातसोडून इतर राज्यं नाहीत का?' असा सवाल राज यांनी उपस्थित केला.