मनसेच्या "एक सही संतापाची" मोहिमेला हजारो गोरेगावकरांचा मिळाला उस्फूर्त प्रतिसाद
By मनोहर कुंभेजकर | Published: July 10, 2023 05:23 PM2023-07-10T17:23:01+5:302023-07-10T17:24:09+5:30
सध्याचे रसातळाला गेलेल्या राजकरणाचा व्यक्त केला संताप
मुंबई- मनसेच्या "एक सही संतापाची" या मोहिमेला हजारो गोरेगावकरांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. गोरगाव पश्चिम स्टेशनच्या बाहेर दि, ८ आणि दि,९ जुलै रोजी सलग दोन दिवस संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभा अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांनी ही मोहिम राबवली होती.
सध्याचे राजकारण रसातळाला गेले असून त्याचा चिखल झाला आहे.त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी ही सह्यांची मोहिम आखण्यात आली होती.गोरेगाव पश्चिम स्टेशनच्या बाहेर लावलेले दोन्ही फलक पूर्ण साह्यने भरले. गोरेगाव रेल्वे स्थानकातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या सुमारे ४००० ते ५००० नागरिकांनी खास थांबून या आजच्या चाललेल्या फोडाफोडीच्या राजकारणचा संताप व्यक्त करत सह्या केल्या अशी माहिती वीरेंद्र जाधव यांनी दिली.
या मोहिमेत उपविभाग अध्यक्ष- औधुत साळवी, सचिन सावंत,कांचन बुरखे मोहिनी सलीयन विभाग अध्यक्ष- धनश्री नाईक, शाखा अध्यक्ष -संजय खानोलकर, शैलेंद्र मोरे, भूषण फडतरे, सुरेंद्र गावडे, अश्विनी यतांबे, उर्वशी पटेल, कविता गमरे,अरुण गवळी, मंगेश पवार, मीना असावा, सचिव - ज्योती परमार आणि इतर सेल चे विनीत गुप्ते,अशोक इंगोले, बाबू सूद,सागर भद्रीके , प्रमोद कपिलें आणि मनसैनिकांनी सहभाग घेतला.