Join us

शिवसेनेत जाणाऱ्या वसंत गितेंना मनसेची ऑफर, 'या' 3 नेत्यांवर फोडलं खापर

By महेश गलांडे | Published: January 07, 2021 10:25 AM

गेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे, आपला पक्ष बळकट करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सर्वस्व पणाला लावताना दिसत आहेत. मनसेचे पूर्वाश्रमीचे नेते आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते लवकरच शिवबंधन हाती बांधणार आहेत. वसंत गिते शिवसेनेत परतणार असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन घरवापसी करण्याचे सूचवल होते. मात्र, गिते यांनी शिवसेना मला आईसमान आहे, असे म्हणत मनसेत येण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यासोबतच, मनसेतील तीन नेत्यांच्या नेृत्वावामुळे आपण मनसेत येऊ इच्छित नसल्याचेही त्यांनी सांगितल्याचे समजते. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपात अस्वस्थ असणारे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि सुनील बागुल हे दोघे त्यांच्या मूळ स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा असली तरी अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. सुनील बागुल गुजरातच्या धरतीवर असून तेथून परतल्यानंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर आज गुरूवारी (दि.७) शिवसेना नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येणार असून गिते यांच्या प्रवेशाबाबत त्यांच्याशी चर्चा होणार असल्याचे समजते. दरम्यान, भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी या दोन्ही नेत्यांच्या अन्य पक्षात जाण्याचा इरादा असल्याचा इन्कार केला आहे. गिते आणि बागुल हे दोघेही हाडाचे शिवसैनिक असले तरी सध्या दोघेही भाजपत आहेत. यात त्यांच्या दोघांच्या कुटुंबीयांना अनुक्रमे उपमहापौरपद मिळाले असले तरी त्यांना स्वत:ला अपेक्षित पदे मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून गिते उमेदवारी करणार असल्याचीदेखील चर्चा होती. मात्र, त्यानंतरही हा विषय मागे पडला. परंतु तेव्हापासून गिते हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच, मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसंत गिते यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षात परतण्याचं सूचवलं होतं. मात्र, मला ज्या तीन नेत्यांमुळे मनसेतून बाहेर पडावं लागलं, त्या नेत्यांसोबत काम करावं का? असा प्रश्न गिते यांनी विचारला. गिते यांचा रोख पूर्णपणे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याकडेच होता. नाशिकमध्ये मनसेला आपण वाढवलं, पक्षाचं काम मोठं केल. पण, भविष्यात आपल्याला स्पर्धक निर्माण होईल, म्हणून काही जणांनी मला पक्षातून बाहेर पडण्यास भाग पाडलं, असे यावेळी गिते यांनी म्हटले. तसेच, शिवसेना ही मला आईसमान आहे, असे सांगत शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेतही गिते यांनी यावेळी दिले. त्यामुळे, मनसेचे नेते निरुत्तर झाले. 

टॅग्स :वसंत गीतेमनसेशिवसेनानाशिकभाजपा