Join us

कोस्टल रोडला मनसेचा रेड सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 3:33 AM

सामना रंगला : कोळी बांधव आयुक्तांकडे

मुंबई : पहारेकऱ्यांच्या धास्तीने कोस्टल रोड प्रकल्पाचे घाईघाईने रविवारी भूमिपूजन पार पडणाºया शिवसेनेला आता मनसेलाही तोंड द्यावे लागत आहे. मच्छीमारांचा प्रश्न सोडविण्यापूर्वी कोस्टल रोडचे काम सुरू केल्यास ते बंद पाडण्यात येईल, असा इशाराच मनसेने दिला आहे. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे, तर दुसरीकडे या प्रकल्पाबाबत तक्रार करण्यास कोळी बांधवांनी आयुक्तांनी भेट घेतली.

शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या मार्गातील विघ्न काही सुटण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भुलाबाई देसाई रोड, अमरसन्स उद्यान येथे या प्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन केले. मात्र, मनसेच्या नेतृत्वाखाली वरळीतील स्थानिक कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजय मेहता यांची आज पालिका मुख्यालयात भेट घेतली. या बैठकीत मच्छीमारांच्या तक्रारी ऐकण्यासाठी दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. या प्रकल्पाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत सामान आणून टाकले जात आहे. मात्र, रात्रीच्या अंधारात चोरासारखे काम करण्यापेक्षा दिवसा काम करून दाखवा, असे आव्हान मनसेने शिवसेनेला दिले आहे. भूमिपुत्रांना विस्थापित करून हा प्रकल्प होऊ देणार नाही. त्यामुळे हवेतील गोष्टी करण्यापेक्षा लेखी आश्वासन देऊन मच्छीमारांना दिलासा द्या. अन्यथा काम थांबवावे लागेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोमवारी दिला.मातोश्रीवरून बोलावणे नाहीचच्भकास करून विकास करणार नाही, असे स्पष्ट करीत उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांबरोबर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मातोश्रीवरून अद्याप बोलावणे आलेले नाही, असे मच्छीमारांच्या शिस्टमंडळांनी उघड केली. या प्रकल्पावर २०१४ पासून काम सुरू आहे. मात्र, या चार वर्षांमध्ये तांत्रिक अडचणींबाबत चर्चा झालीच नाही. आमची रोजीरोटी कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, असा इशारा मच्छीमारांचे प्रतिनिधी राजाराम पाटील यांनी दिला. 

टॅग्स :मुंबई