देशात वेगाने पसरतोय मोबाइल बँकिंग व्हायरस, कशी कराल सुरक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 01:05 PM2022-09-19T13:05:37+5:302022-09-19T13:06:41+5:30

‘सोवा’मुळे आर्थिक फसवणुकीचा धोका वाढला

Mobile banking virus is spreading rapidly in the country | देशात वेगाने पसरतोय मोबाइल बँकिंग व्हायरस, कशी कराल सुरक्षा?

देशात वेगाने पसरतोय मोबाइल बँकिंग व्हायरस, कशी कराल सुरक्षा?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील सायबर क्षेत्रात एक नवीन मोबाइल बँकिंग व्हायरस पसरत आहे. ग्राहकांना टार्गेट करणारा हा मोबाइल बँकिंग ट्रोजन व्हायरस ‘सोवा’ हा एक रॅन्समवेअर आहे, जो अँड्रॉइड फोनच्या फाइल्स खराब करून, व्यक्तीला आर्थिक फसवणुकीचा बळी बनवतो. हा व्हायरस मोबाइलमध्ये आला की, तो काढणेही अवघड आहे, असे केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सीने सांगितले.

जुलैमध्ये भारतात हा व्हायरस प्रथम आढळला होता. तेव्हापासून तो पाच वेळा बदलून नव्या रूपात येत हल्ला करत आहे. सीईआरटी-ईन (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम)ने सांगितले की, नवीन सोवा व्हायरस मोबाइल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करत आहे.

 व्हायरस नेमका काय करतो? 
nमालवेअर प्रथम सप्टेंबर, २०२१ मध्ये गुपचूप बाजारात आला होता. 
nतो नाव आणि पासवर्ड, लॉग इन करण्यास, कुकीज चोरण्यास आणि ॲपवर परिणाम करण्यास सक्षम आहे. 
nहा मालवेअर पूर्वी अमेरिका, रशिया आणि स्पेनसारख्या देशांमध्ये अधिक सक्रिय होता.
nपरंतु जुलै, २०२२ मध्ये त्याने भारतासह इतर अनेक देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.

 कसा ओळखाल? 
nया मालवेअरचे नवे स्वरुप बनावट अँड्रॉइड ॲप्लिकेशन्स तयार करून वापरकर्त्यांना सहज फसवते. 
nत्यानंतर, ते क्रोम, ॲमेझॉन, एनएफटी (क्रिप्टो करन्सी लिंक्ड टोकन) सारख्या लोकप्रिय वैध ॲप्सच्या ‘लोगो’सह दिसते. 
nहे बदल मोबाइलमधील ॲप्समध्ये होत असताना, त्याची साधी माहितीही वापरकर्त्यांना होत नाही.
nएकदा फोनवर बनावट अँड्रॉइड ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले की, ते मोबाइलवर इन्स्टॉल केलेल्या सर्व ॲप्लिकेशन्सची यादी कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवर पाठवते. त्यानंतर, जे हा मालवेअर नियंत्रित करतात, त्यांना याची सर्व माहिती अपोआप मिळत राहते. त्यानंतर,
फसवणुकीला सुरुवात होते.

किती आहे धोकादायक? 
nतो स्क्रीनशॉट घेऊ शकतो
nवेबकॅमवरून व्हिडीओ रेकॉर्डही करू शकतो.
nहा व्हायरस सर्व ॲप्स बंद पाडून वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी २०० हून अधिक बनावट बँकिंग आणि पेमेंट ॲप्लिकेशन्स तुमच्या फोनमध्ये टाकू शकतो.
nफोनमधील सर्व डेटा मिळवून त्याचा गैरवापर करण्याची त्याची क्षमता आहे.
nगोपनीय माहिती सहज काढून घेतो.

काय काळजी घ्याल? 
nव्हायरसला रोखण्यासाठी वापरकर्त्यांनी केवळ अधिकृत ॲप स्टोअरमधून ॲप डाऊनलोड करावे. 
nवापरकर्त्यांनी ॲप वापरताना त्याचा गैरवापर होत नाही ना, याबाबत दक्ष राहावे. इतर लोक हे ॲप वापरत असतील, तर त्यांचे अनुभव काय आहेत, हेही तपासावेत. 
nनियमितपणे अँड्रॉइड अपडेट करावे.
nई-मेल किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.

Web Title: Mobile banking virus is spreading rapidly in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.