Join us  

‘बेस्ट’मध्ये मोबाइल चार्जिंग

By admin | Published: March 04, 2016 3:22 AM

मुंबईतील बेस्टच्या बस ‘स्मार्ट’ करण्याच्या दिशेने बेस्ट उपक्रमाने पावले टाकली आहेत़ प्रशासनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन ३०३ बसगाड्यांमध्ये मोबाइल चार्जिंगची सुविधा असणार आहे़

मुंबई : मुंबईतील बेस्टच्या बस ‘स्मार्ट’ करण्याच्या दिशेने बेस्ट उपक्रमाने पावले टाकली आहेत़ प्रशासनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन ३०३ बसगाड्यांमध्ये मोबाइल चार्जिंगची सुविधा असणार आहे़ या बसगाड्यांची लांबी अधिक असल्याने प्रवासही आरामदायी होणार आहे़ तसेच वाय-फाय सेवेबाबतसुद्धा चाचपणी सुरू आहे़आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिका पालक संस्था म्हणून १०० कोटी रुपये अनुदान देणार आहे़ नियमित बसगाड्यांची ११ मीटर असलेली लांबी वाढवून १२ मीटर करण्यात आली आहे़ तसेच बसमध्ये मोबाइल चार्जिंगसाठी दोन ठिकाणी सोय असणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत आज प्रशासनाने सादर केला़ मात्र केवळ दोन चार्जिंग पॉर्इंट्सने लोकांची गैरसोयच होईल़ याऐवजी प्रत्येक आसनामागे चार्जिंगची सोय करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़ तसेच बस पुरविणाऱ्या ठेकेदाराकडूनच सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत व वाय-फाय सेवा उपलब्ध करावी, अशी सूचना सदस्यांनी केली़ वाहतूककोंडीची समस्यावाहतूककोंडीमध्ये अडकून राहणाऱ्या बेस्टच्या बसगाड्यांना लेटमार्क लागत आहे़ यामुळे प्रवाशांनाही तिष्ठत राहावे लागते़ बसगाड्यांची लांबी वाढविल्यास एवढी मोठी गाडी वळविणे अडचणीचे ठरेल, अशी भीती काही सदस्यांनी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)सोशल मीडियात बेस्ट अवतरलीहायटेकच्या युगात प्रवाशांपर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे़ यासाठी बेस्टने आपले अधिकृत फेसबुक पेज सुरू केले आहे़ यावर बसमार्गांची माहिती, विशेष योजना, वीज दर व विद्युत विभागांशी संबंधित सर्व माहिती मुंबईकरांना मिळणार आहे़ या माध्यमातून मुंबईकरांकडून सेवासुविधांबाबत प्रतिक्रिया व सूचनाही मागविण्यात आल्या आहेत़