मुंबई : भांडुपमधील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेल्या ग्राहकाच्या खिशातील मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी घडली. याचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र या प्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार करण्यात आली नसल्याचे भांडुप पोलिसांनी सांगितले.भांडुपच्या स्टेशनलगतच हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये दुपारच्या सुमारास संबंधित व्यक्ती नाश्ता करण्यासाठी आली होती. त्या वेळी शर्टाच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलमधून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मोबाइल खाली फेकला. तोच त्याचा स्फोट झाला आणिग्राहकांची पळापळ झाली. सोमवारी दुपारी १ वाजून ४९ मिनिटांनीही घटना घडली. यात ज्याव्यक्तीचा मोबाइल होता त्याच्या शर्टाने पेट घेतल्याने ते किरकोळ भाजले. त्यांना हॉटेल चालकाने रिक्षात बसवून रुग्णालयातपाठवले.मंगळवारी या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र याबाबत कुणीही तक्रारदार पुढे आले नसल्याने पोलीस ठाण्यातही याची नोंद नाही. जखमी झालेल्या ग्राहकाला हॉटेल चालकाने रिक्षात बसवून रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर तो कुठे व कसा गेला याबाबत कुणालाच माहिती नसल्याचे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
ग्राहकाच्या खिशातील मोबाइलचा स्फोट, भांडुपच्या हॉटेलमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:52 AM