मोबाइल गरम होतोय, काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:24 AM2018-04-10T02:24:07+5:302018-04-10T02:24:07+5:30

दिवसेंदिवस मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आणि बॅटरीवर आलेल्या ताणामुळे मोबाइल गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता वाढली आहे.

Mobile is getting hot, be careful! | मोबाइल गरम होतोय, काळजी घ्या!

मोबाइल गरम होतोय, काळजी घ्या!

Next

मुंबई : दिवसेंदिवस मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आणि बॅटरीवर आलेल्या ताणामुळे मोबाइल गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी, मोबाइल जपून हाताळण्याचे आवाहन मोबाइल तज्ज्ञांनी केले आहे. हलक्या प्रतिची बॅटरी वापरल्यामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे मोबाइलचा स्फोट होण्याची जास्त शक्यता आहे. बॅटरी जास्त वेळ चॉर्ज केल्यामुळे मोबाइलची कार्यक्षमता कमी होते, असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोबाइल स्फोट होण्यामागचे मुख्य कारण हे मोबाइलची बॅटरी आहे. बॅटरीमधील धन आणि ऋणमध्ये बदल झाल्यास, बॅटरीसोबत मोबाइलचा स्फोट होतो. ५ हजार मिली अ‍ॅम्पियर अवर बॅटरीची क्षमता असलेला मोबाइल वापरणे योग्य आहे. १ वर्ष वापरलेल्या मोबाइलची क्रयशक्ती कमी होते, त्यामुळे बॅटरीवर ताण येतो. परिणामी, जास्त वेळ मोबाइल चार्जिंग करावी लागते. अशा वेळी त्याच कंपनीची बॅटरी खरेदी करून वापरावी. काही वेळेस बॅटरी खराब झाल्यामुळे मोबाइल खराब होतो आणि वाढत्या उष्णतेमुळे मोबाइल गरम होतो. बॅटरी आणि बाहेरील तापमान गरम असल्याने स्फोट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कंझ्युमर गाइड्स सोसायटी आॅफ इंडियाचे सहसचिव दिनेश भंडारे यांनी दिली.
उन्हात मोबाइलचा मर्यादेपेक्षा जास्त वापर केल्यावर बॅटरीवर ताण येतो. मात्र, उन्हामुळेच मोबाइलचा स्फोट होत नसला, तरी मोबाइलचा वापर जपून करावा. सोशल मीडियाच्या वापरामुळे बॅटरी जास्त संपते, त्यामुळे बॅटरी जास्त वेळ चार्जिंग केली जाते. चित्रपट, गेम खेळण्यासाठी मोबाइलचा वापर करणे चुकीचे आहे, अशी माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे अभ्यासक अनंत पांडुरंग देशपांडे यांनी दिली. मोबाइलवर तासान्तास गप्पा मारणे टाळावे. तासान्तास गप्पा मारण्याचे मोबाइल हे माध्यम नाही. मोबाइल चार्जिंगला लावून फोनवर बोलणे, ही धोक्याची घंटा आहे. अशा वेळी चार्जिंग बंद करून मोबाइलचा वापर केला जावा.
उन्हात फिरताना घ्या मोबाइलची काळजी
मोबाइलमधील उष्णता बाहेर पडावी, यासाठी पातळ कव्हरचा वापर करावा.
जास्त बॅटरी खर्च करणारे अ‍ॅप वापरू नयेत, जेणेकरून मोबाइल तापणार नाही.
मोबाइल जास्त वेळ चार्जिंगला लावून ठेवल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होते.
मोबाइल गरम झाल्यास थोडा वेळ मोबाइल हाताळणे बंद करावे.
ज्या मोबाइलचा चार्जर आहे, त्याच कंपनीचा चार्जर वापरणे.
उन्हात फिरताना मोबाइल गरम होणार नसल्याची काळजी घ्यावी.
>मोबाइल स्फोट होण्यामागील कारणे...
प्रत्येक मोबाइलधारकाचे इंटरनेट, जीपीएस, कॉलिंग सुरूच असते. त्यामुळे मोबाइल गरम होतो, शिवाय वाढते ऊन हेदेखील मोबाइल गरम होण्यासाठी एक कारण ठरते. अशा वेळी अति गरम झालेल्या मोबाइलचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. काही जण मोबाइलची बॅटरी खूप वेळ टिकावी, यासाठी मोबाइल फूल चार्जिंग करून ठेवतात. यामुळे मोबाइलच्या क्षमतेपेक्षा जास्त काळ चार्ज केल्याने स्फोट होण्याची शक्यता जास्त आहे. मोबाइल वारंवार चार्जिंग केल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते. त्यामुळे मोबाइल सतत चार्जिंगला ठेवणे चुकीची बाब आहे.
>मोबाइल वापरताना घ्या काळजी
मोबाइल चार्जिंग होत असताना, मोबाइलवर बोलणे, गेम खेळणे, सोशल मीडियाचा वापर करणे कटाक्षाने टाळावे. यामुळे एका बाजूने मोबाइल चार्ज होतो, तर दुसरीकडून चार्जिंग कमी होते.
मोबाइल बॅटरी बॅक अप यांचा मर्यादित वापर करावा.
मोबाइलचा अलार्म एकाच वेळचा लावावा. ५-५ मिनिटांचा अलार्म लावल्याने बॅटरी जास्त संपते.
मोबाइल चार्जिंग होत असताना, शक्यतो मोबाइल स्विच आॅफ किंवा एरोप्लेन मोडवर असावा.
५ हजार मिली अ‍ॅम्पियर अवर बॅटरीची क्षमतेचा मोबाइल वापरणे योग्य आहे.

Web Title: Mobile is getting hot, be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.