लिंक पाठवत मोबाईल हॅक, बँकेतून केले लाखो साफ
By गौरी टेंबकर | Published: January 19, 2024 06:50 PM2024-01-19T18:50:36+5:302024-01-19T18:51:21+5:30
अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई: सांताक्रुज पूर्व परिसरात अनिल फाटक (२७) या गारमेंट व्यवसायिकाला ब्लू डार्ट कुरिअरच्या नावाने फोन करत त्यांचे डेबिट कार्ड आल्याचे सांगण्यात आले. ते कार्ड मिळवण्यासाठी त्यांना एक लिंकही पाठवली गेली. ज्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाटक यांनी फोनमध्ये आलेली ती लिंक क्लिक करत त्यात स्वतःचा नंबर टाकला. त्यामुळे लगेचच फोन हॅक झाला. त्यांच्या खात्यातून अद्याप ४ लाख ४३ हजार ९०० रुपये काढण्यात आले आहेत त्यामुळे त्यांनी ती लिंक डिलीट केली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याविरोधात वाकोला पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.