मोबाइल पास शुक्रवारपासून

By admin | Published: October 8, 2015 03:40 AM2015-10-08T03:40:10+5:302015-10-08T03:40:10+5:30

प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईत पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गांवर पेपरलेस मोबाईल तिकीट सुविधा सुरु करण्यात आली. आता मध्य रेल्वे

Mobile passes from Friday | मोबाइल पास शुक्रवारपासून

मोबाइल पास शुक्रवारपासून

Next

मुंबई : प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईत पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गांवर पेपरलेस मोबाईल तिकीट सुविधा सुरु करण्यात आली. आता मध्य रेल्वे मार्गावरही अशीच सेवा ९ आॅक्टोबरपासून सुरु केली जात असून, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे शुभारंभ केला जाणार आहे. त्याचप्रमाणे, पेपरलेस मोबाइल पासही सुरू केला जात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पेपरलेस मोबाईल तिकीट सेवा पश्चिम रेल्वेवर सुरूझाल्यानंतर मध्य रेल्वेवर मात्र ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती. ही
सेवा आता मध्य रेल्वेवरही उपलब्ध करून देण्यात येत आहे. पासधारकांसाठीही पेपरलेस मोबाइल पास सेवा सुरू करण्यात येत असून, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ती याच तारखेला सुरू होईल, असे सांगण्यात आले.

दररोज तिकिटांचा रंग बदलत राहणार
मोबाईलवर तिकीट काढल्यानंतर या तिकिटांचा रंग प्रत्येक दिवशी बदलता ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार रोखण्यामागेच नियोजन असणार आहे.

नोट किंवा कॉईन टाकताच तिकीट देणारे यंत्र
नोट किंवा कॉईन टाकताच तिकीट देणारी मशिनही मध्य रेल्वेच्या सीएसटी, दादर, एलटीटी तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेन्ट्रल स्थानकात बसवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभही ९ आॅक्टोबर रोजी करण्यात येईल.
या मशिनमध्ये जेवढी तिकिटांची किंमत असेल, तेवढेच पैसे टाकणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, पाच रुपयांच्या तिकिटांसाठी दहा रुपयांची नोट या मशिनमध्ये टाकल्यास उर्वरित पैसे परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले.

नोंदणीची सगळी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर शून्य बॅलन्स आर-वॉलेट खाते युनिक लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे सुरू करावे लागते.
प्रवाशाला यूटीएस बुकिंग काऊंटर्सवरून १00 रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंतचे आर वॉलेट रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली असून, रिचार्जनंतर तिकीट बुक करून माहिती मोबाइलवर असलेल्या युनिक बुकिंग आयडीवर येते.
हे तिकीट दुसऱ्याच्या मोबाइलवर पाठवू शकणार नाही किंवा त्याची प्रिंट काढण्याची सोय उपलब्ध नाही.

मध्य रेल्वेवरील सीएसटी, दादर, पनवेल, ठाणे आणि एलटीटी तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल, बोरिवली, अंधेरी, दादर, वसई रोड आणि बांद्रा स्थानकात पेपरलेस मोबाइल प्लॅटफॉर्म तिकीट ९ आॅक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे.

पेपरलेस मोबाइल पास, तिकीट कसे मिळवाल?
‘यूटीएस आॅन मोबाइल’ या रेल्वेच्या अ‍ॅपवरून हे डाऊनलोड करता येईल.
रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सीस्टिम) मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले.
हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून, तर विंडोज फोनवर विंडोज स्टोअरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे.
प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव यात नोंदवावे लागते.

Web Title: Mobile passes from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.