मुंबई - झारखंडहून मुंबईत आलेली तीन अट्टल मोबाईल चोरांची टोळी भाड्याच्या घरात राहून लोकलमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरी करायचे. मुकेश कुमार महंतो, उत्तम कुमार ठाकूर आणि इत्सिखार शेख या तिघांना अटक करण्यात मध्य रेल्वे लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. हे मस्जिद बंदर येथील भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्याकडून ११ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत ११ लाख ८८ हजार ९९७ रुपये आहे.
ठाणे युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांना या मोबाईल चोरणाऱ्या सराईत टोळी मुंबईत सक्रिय असल्याची असल्याची खबर लागली होती. त्यानुसार, मुंबईत सापळा रचून या तीन सराईत मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. झारखंडहून दोन - तीन महिन्यांसाठी मुंबईत येऊन मोबाईल चोरी हि गॅंग करायची. त्यानंतर ते पश्चिम बंगालमधील एका मित्राला चोरलेले मोबाईल फोन विकून त्यातून पैसे कमवायचे. वृद्ध आई - वडिलांचा उदरनिर्वाह करण्यासाठी तसेच झटपट पैसे कमविण्यासाठी ते मोबाईल चोरी करत असे सीएसटीएम रेल्वे पोलिसांचे उपायुक्त समाधान पवार यांनी सांगितले. . त्याचप्रमाणे हे चोरलेले मोबाईल पश्चिम बंगालमधून बांगलादेशमध्ये विकत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.