Join us

क्लोन एटीएम कार्डमार्फत मोबाईल शॉपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसरमधील एका मोबाईलच्या दुकानात क्लोन एटीएम कार्डमार्फत फोन खरेदी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहिसरमधील एका मोबाईलच्या दुकानात क्लोन एटीएम कार्डमार्फत फोन खरेदी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या बुधवारी आवळण्यात आल्या. चौकशीदरम्यान त्यांचा म्होरक्या बंगलोरमध्ये 'दि स्टार' नामक कंपनी चालवत असल्याचे उघड झाले असून, त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे.

दहीसरच्या एस व्ही रोड परिसरात काही लोक क्लोन केलेल्या एटीएममार्फत मोबाईल खरेदी करीत असल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ओम तोतावार यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली. त्यांच्या झडतीत ४० हून अधिक बँकांचे २५० ब्लँक एटीएम कार्ड, चार मोबाईल फोन, लॅपटॉप आणि हजारो ग्राहकांचा खासगी डेटा सापडला आहे. बंगलोरमध्ये असलेला त्यांचा सहकारी या टोळीला खातेधारकांचे बँक डिटेल्स पाठवायचा व उरलेली टोळी कार्ड क्लोन करत त्यातून पैसे काढून अन्य साठी त्यांच्या साथीदारांना पाठवायचे हे उघड झाले असून, अधिक चौकशी सुरू आहे.