मोबाईलने घालवली आबालवृद्धांची ‘मेमरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:06 AM2021-07-08T04:06:05+5:302021-07-08T04:06:05+5:30

मुंबई : मानवी मेमरी खूप चांगली आहे. मात्र, एकाचवेळी मोबाईलवर अनेक गोष्टी पाहत असल्याने त्या लक्षात ठेवणे कठीण जाते. ...

Mobile spends 'memory' of young and old | मोबाईलने घालवली आबालवृद्धांची ‘मेमरी’

मोबाईलने घालवली आबालवृद्धांची ‘मेमरी’

Next

मुंबई : मानवी मेमरी खूप चांगली आहे. मात्र, एकाचवेळी मोबाईलवर अनेक गोष्टी पाहत असल्याने त्या लक्षात ठेवणे कठीण जाते. मोबाईलमुळे माहितीचा मारा मेंदूवर प्रचंड होत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्य़ंत प्रत्येकजण आज मोबाईलवर विसंबून राहू लागला आहे. यामुळे कुठेतरी स्मरणशक्तीवर परिणाम होतो आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद म्हणाल्या की, मोबाईलच्या अतिवापरामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतोय, हे अद्याप कोणत्याही संशोधनातून सिद्ध झालेले नाही. परंतु, एकाअर्थी पाहायला गेले तर मोबाईलमुळे मेमरीवर परिणाम होऊ लागला आहे. मुळात, मोबाईल हे पूर्वीपासूनच आहेत. आधी मोबाईल केवळ संपर्काचे माध्यम म्हणून ओळखले जात होते. परंतु, आता संपर्कापेक्षा अन्य गोष्टींसाठी याचा वापर वाढला आहे.

सकाळी उठल्यापासून आपल्या हातात पहिला मोबाईल येतो. यामुळे कुठेतरी स्मरणशक्तीवर परिणाम होतोय. स्मरणशक्ती कमी होणे ही समस्या टाळण्यासाठी मोबाईलचा वापर केवळ गरजेपुरताच केला पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी मोबाईलवर अवलंबून न राहता ती गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

- एखादा पत्ता माहिती नसल्यास आपण आजुबाजूच्या लोकांना विचारायचो.

- पुढच्या वेळी लक्षात ठेवायचो.

- पण आता गुगल मॅपमुळे हे सुद्धा सोयीचे झाले आहे.

- यामुळे स्मरणशक्तीशी संबंधित समस्या वाढताना दिसून येत आहे.

हे कशामुळे होते?

- साठीनंतर अनेकांमध्ये दिसणारी स्मरणशक्तीशी संबंधित समस्या आता ४५ वयोवगटातील लोकांमध्येही प्रकर्षाने आढळून येत आहे.

- त्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर करू नये.

- एखाद्याला संपर्क साधायचा असल्यास मोबाईलमधून त्याचा क्रमांक शोधून काढण्यापेक्षा तो स्वतः लक्षात ठेवून डायल करण्याची सवय ठेवा.

आजी

एकेकाळी मोबाईल नव्हते. तेव्हा प्रत्येक गोष्ट स्मरणात राहत होती. आजही आपण मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. जेव्हा गरज आहे तेव्हाच त्याचा वापर करणे योग्य होय. मोबाईल आपल्यासाठी आहे. आपण मोबाईलसाठी नाही, हे लक्षात ठेवा.

- सुलोचना शेळके

-------------------

वडील

मोबाईल आयुष्याचा भाग झाला आहे. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आहे त्याप्रमाणे आता मोबाईल झाला आहे. आपली प्रत्येक गोष्टच मोबाईलशी जोडली गेली आहे. मात्र, तरीही प्रत्येकाने मोबाईलचा वापर गरजेपुरताच केला पाहिजे.

- नीलेश शेळके

--------------

मुलगी

आजचे जगच तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे मोबाईल आयुष्याचा नकळत भाग झाला आहे. आपण मोबाईलचा वापर कामापुरता केला पाहिजे. त्याचे व्यसन लागता कामा नये. मोबाईलचा अतिरेक कमी केला तर आपण आपल्या स्मरणशक्तीचा अधिकाधिक वापर करू शकतो.

- नीलक्षी शेळके

------------

आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हजारोंच्या वरती संपर्क क्रमांक असतात. संपर्काची एवढी मोठी यादी गुगल किंवा ई-मेलवर स्टोरेज होत असल्याने ते गहाळ होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे मोबाईल क्रमांक लक्षात ठेवण्याचा ताण कोणी घेत नाही. अनेकांना तर स्वतःचा मोबाईल नंबरही लक्षात नसतो, ही वस्तूस्थिती आहे. मोबाईलवर अवलंबून राहणे, हे यामागील मुख्य कारण आहे. बहुतांश लोक नियमित औषध घेण्यासाठीही वेळ चुकू नये, यासाठी मोबाईलमध्ये अलार्म लावतात. औषधांच्या वेळासुद्धा लोक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत.

- डॉ. सागर कारिया, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Mobile spends 'memory' of young and old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.