‘नैना’साठी मोबिलिटी इंटिग्रेटेड योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:56 AM2018-11-12T02:56:27+5:302018-11-12T02:57:08+5:30

मुख्यमंत्र्यांची माहिती : उपनगरीय रेल्वे सेवेचा शुभारंभ; स्थानक परिसरात सिडको करणार ४० हजार घरांची निर्मिती

Mobility Integrated Scheme for 'Naina' | ‘नैना’साठी मोबिलिटी इंटिग्रेटेड योजना

‘नैना’साठी मोबिलिटी इंटिग्रेटेड योजना

नवी मुंबई : मुंबईपेक्षा तिप्पट क्षेत्रफळ असलेल्या सिडकोच्या ‘नैना’ क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोबिलिटी इंटिग्रेटेड योजना राबविण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर असून लवकरच त्या बाबतची घोषणा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सीवूड-नेरुळ-उरण मार्गाच्या खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यानच्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केले. तसेच विविध रेल्वेविषयी सुविधांचेही लोकार्पण केले. या वेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पाचा आढावा घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा प्रकल्प आहे. हे विमानतळ निर्धारित वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने स्थानिकांनी सहकार्य करण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यात गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे, गावांच्या विकासासाठी क्लस्टर योजना हे प्रमुख विषय आहेत. या दोन्ही प्रकल्पांचा अंतिम आराखडा तयार झाला असून, लवकरच त्याबाबतची अधिसूचना काढली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करावा, या दृष्टीने सिडकोने योजना आखली आहे. याअंतर्गत रेल्वेस्थानक परिसरात ४० हजार घरे बांधली जाणार आहेत. तसेच येत्या काळात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक लाख घरांच्या निर्मितीची योजना सिडकोने तयार केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. एकूणच सिडकोच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात अनेक विकासकामे सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, जलवाहतूक, रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे आदीमुळे रायगड जिल्ह्याला वेगळे महत्त्व प्राप्त होणार
असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आपल्या भाषणातून या प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर भाजपा-शिवसेनेसह विरोधी पक्षातील नेत्यांनीही उपस्थिती दर्शविली.

च्नेरुळ-खारकोपर मार्गावर सोमवारपासून नियमित सेवा सुरू होणार आहे.
च्नेरुळ-खारकोपर-नेरुळ आणि बेलापूर-खारकोपर-बेलापूर अशा अप व डाउन मिळून दरदिवशी २० -२० फेऱ्या होणार आहेत.
च्नेरुळ स्थानकातून सुटणारी ट्रेन सीवूड, बामणडोंगरी, खारकोपर या स्थानकांवर थांबेल, तसेच बेलापूर येथून सुटणारी लोकल बामणडोंगरी, खारकोपर या मार्गे जाईल.


प्रकल्पाची वैशिष्ट्ये
च्या मार्गामुळे दक्षिण मुंबईच्या विकासाला चालना मिळणार आहे. या रेल्वेमार्गाची लांबी २७ कि.मी. इतकी आहे. पहिला टप्पा सीवूड ते खारकोपर आणि बेलापूर ते सागरसंगम असा आहे. या मार्गाची लांबी १२ कि.मी. इतकी आहे.
च्खारकोपर-उरण हा या प्रकल्पाचा दुसरा टप्पा आहे. १५ कि.मी. लांबीच्या या मार्गावर खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी व उरण या स्थानकांचा समावेश आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण दहा स्थानके आहेत. दुसºया टप्प्याचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे, या टप्प्याचे संपूर्ण काम रेल्वेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

Web Title: Mobility Integrated Scheme for 'Naina'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई