मनसे फेरीवाला आंदोलनाची राजकीय खिल्ली
By admin | Published: July 23, 2014 03:55 AM2014-07-23T03:55:40+5:302014-07-23T03:55:40+5:30
फेरीवाल्यांचे सव्रेक्षण रद्द करण्याच्या मनसेच्या मागणीवर अन्य राजकीय पक्षांकडून उलट प्रतिक्रिया उमटत आहेत़
Next
मुंबई : फेरीवाल्यांचे सव्रेक्षण रद्द करण्याच्या मनसेच्या मागणीवर अन्य राजकीय पक्षांकडून उलट प्रतिक्रिया उमटत आहेत़ काँग्रेसने यास निवडणूक काळातील स्टंट म्हटले असून मनसे स्वत: स्टॉल लावून फेरीवाले वाढवत असतील, अशी खिल्ली भाजपाने उडवली आह़े मात्र परप्रांतीय वाढत असल्याच्या मुद्दय़ाला मनसेने हात घातल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याने शिवसेनेच्या पालिकेतील शिलेदारांची बोलती बंद झाली आह़े
अनेक वर्षापासून रेंगाळलेले फेरीवाला धोरण राबविण्यासाठी पालिकेने सव्रेक्षण सुरू केले आह़े त्यानुसार मुंबईतील एकूण फेरीवाले किती हे जाणून घेण्यासाठी नोंदणी सुरू आह़े मात्र यामुळे फेरीवाल्यांची संख्या वाढू लागली आह़े त्यामुळे हे सव्रेक्षण तत्काळ थांबविण्याची ताकीद मनसेने पालिकेला दिली
होती़ तरीही दादर येथील
पालिका कार्यालयात अर्ज वाटप
सुरू असताना मनसेने घेराव
घालून काम बंद करण्याचा प्रयत्न आज केला़
मात्र विधानसभा निवडणुकीत मुद्दा नसल्याने मनसे हा राजकीय स्टंट करीत असल्याची तिखट प्रतिक्रिया अन्य राजकीय पक्षांतून उमटत आह़े विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने हा स्टंट सुरू केला असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी लगावला आह़े
तर रस्त्यावर स्टॉल थाटणारा पक्षच आता फेरीवाल्यांच्या विरोधात बोलत असल्याची खिल्ली भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी उडवली आह़े (प्रतिनिधी)
शिवसेनेची सावध भूमिका
8क् टक्के भूमिपुत्रंना फेरीवाला धोरणात प्राधान्य देण्याची मागणी मनसेने केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आह़े मराठी माणसाच्या भूमिकेवरून मुंबईकरांर्पयत पोहोचलेल्या शिवसेनेला यावर सावध भूमिका घ्यावी लागत आह़े याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना विचारले असता, त्यांची बोलती बंद झाली़ हे निव्वळ सव्रेक्षण असून न्यायालयाच्या आदेशानुसार करणो भाग असल्याची सारवासारव फणसे यांना करावी लागली़
फेरीवाल्यांना मुंबईत जागा नाही
मुंबईत 15 हजार परवानाधारक फेरीवाले असून बेकायदा फेरीवाल्यांची संख्या अडीच ते तीन लाख आह़े सव्रेक्षणासाठी आतार्पयत 8क् हजार फेरीवाल्यांना अर्जाचे वाटप झाले आह़े केंद्राच्या सूचनेनुसार शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्के फेरीवाले असावेत़ त्यामुळे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत तीन लाख फेरीवाल्यांची तजवीज करावी लागेल़ मात्र मुंबईत एवढी जागा नसल्याने या धोरणातील या अटीचा अंमल अवघड असल्याची तक्रार अधिकारी करीत आहेत़