पश्चिम द्रुतगती मार्गावरील मॉडेल बस स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:54 AM2019-06-06T01:54:32+5:302019-06-06T01:54:38+5:30

पश्चिम द्रुतगती मार्गावर रोज सुमारे ५ लाख वाहने मार्गक्रमण करतात. तर मुंबईत येणाºया व मुंबईतून जाणाºया बसची संख्या हजारोवर आहे.

Model bus station on the Western Express Highway | पश्चिम द्रुतगती मार्गावरील मॉडेल बस स्थानक

पश्चिम द्रुतगती मार्गावरील मॉडेल बस स्थानक

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : कांदिवली (पूर्व) पश्चिम द्रुतगती मार्गावरील समतानगर पोलीस स्टेशनजवळ असलेल्या छोट्या डोंगराच्या तळाच्या भागाचा उपयोग पूर्वी अतिक्रमण व डम्पिंगसाठी केला जात होता. पश्चिम द्रुतगती मार्गावरील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी सदर डोंगराळ भाग काढून येथे सर्व्हिस रोड, टॉयलेट व मॉडेल बस थांबा उभारला आहे. कांदिवली पूर्व येथील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. उत्तर मुंबईत सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते नुकतेच येथील सर्व्हिस रोड, टॉयलेटचे उद्घाटन झाले असून, सर्व्हिस रोडमुळे येथील वाहतूककोंडी फुटेल, असा दावा केला जात
आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावर रोज सुमारे ५ लाख वाहने मार्गक्रमण करतात. तर मुंबईत येणाºया व मुंबईतून जाणाºया बसची संख्या हजारोवर आहे. त्यातच मेट्रोचे काम सुरू होत असल्याने वाहतूककोंडीत वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून अतुल भातखळकर यांनी येथील समतानगर पोलीस स्टेशनजवळ एक सर्व्हिस रोड तयार करून घेतला आहे. यामुळे आता बाहेरगावच्या गाड्या आणि एसटी बस येथे थांबण्यास सुरुवात झाली.

येथील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली. भविष्यात या सर्व्हिस रोडच्या पलीकडच्या रस्त्यावर मेट्रोचे बाणगंगा स्टेशन येणार असून पादचारी पुलावरून मेट्रोने उतरून बाहेरगावच्या गाड्या प्रवाशांना सहज पकडता येतील. येथील पूर्वी असलेल्या डोंगराळ उंचवट्याचा तसा उपयोगच नव्हता. कांदिवली पूर्व मतदारसंघातील बाहेरगावी जाणारे प्रवासी साहित्यासह बसची वाट बघत ऊन-पावसात उभे राहत असत. त्यांना टॉयलेटचीही सुविधा नसल्याने येथे टर्मिनसची कल्पना सुचली. या टर्मिनससाठी खास सर्व्हिस रोड बांधून घेतला. त्यामुळे येथील हजारो प्रवाशांना दिलासा मिळून वाहतूककोंडी कमी होईल, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Model bus station on the Western Express Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.