मॉडेलवर बलात्कार
By Admin | Published: April 24, 2016 03:06 AM2016-04-24T03:06:48+5:302016-04-24T03:06:48+5:30
रार पोलीस ठाण्यात शनिवारी एका मॉडेलने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अठ्ठावीस वर्षीय पीडित मॉडेल मालाडच्या कुरार परिसरात राहते. कुरार पोलिसांनी दिलेल्या
मुंबई : कुरार पोलीस ठाण्यात शनिवारी एका मॉडेलने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अठ्ठावीस वर्षीय पीडित मॉडेल मालाडच्या कुरार परिसरात राहते. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी शादी डॉट कॉम या मेट्रीमोनियल साइटवरून कुमार (नावात बदल) याच्याशी तिची ओळख झाली. कुमार कुर्ला परिसरात राहत असून विवाहित आहे. मात्र, त्याने या पीडित महिलेला तो अविवाहित असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री वाढवली. त्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. कुमारने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याचे तिचे म्हणणे आहे. सहा महिन्यांपूर्वी कुरारमधील भाड्याचे घरदेखील त्यानेच तिला मिळवून दिले. मात्र, नंतर लग्नासाठी टाळाटाळ करू लागला. त्या वेळी कुमार विवाहित असल्याचे तिला समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कुरार पोलीस ठाण्यात धाव घेत कुमारविरोधात गुन्हा दाखल केला. ‘आम्ही या प्रकरणी बलात्कार, फसवणूक अशा कलामांखाली गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेत आहोत,’ अशी माहिती कुरार पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.