मुंबई, पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; हिंदमाता सर्कल तुडूंब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 09:18 PM2022-06-30T21:18:41+5:302022-06-30T21:20:01+5:30
पुढील तीन ते चार तासांत मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली होती. आज पावसाने मुंबई, पुण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. यामुळे मुंबईतील नेहमीच्या हिंदमाता सर्कलवर पाणी साचले होते. तसेच गांधी मार्केटमध्ये पाण्याचा निचरा होत होता.
मुंबईत गेल्या १२ तासांत कुलाब्याला 163.8 मिमी आणि सांताकृझला 105 मिमी पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार तासांत मुंबईत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस, हिंदमाता येथे पाणी साचले. #Mumbai#Rain#Punehttps://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/mZvSSIHTlK
— Lokmat (@lokmat) June 30, 2022
तसेच पुण्यामध्ये देखील गेल्या दोन तासांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सुमारे महिनाभराच्या विलंबाने पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे, यामुळे धरणसाठ्यांमध्ये पाण्याची वाढ झाली तर मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील कपात मागे घेण्यात येईल.