Join us

आधुनिक युगात योग हे आत्म-नियंत्रण, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्म्याच्या समृद्धीसाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : योग आपल्या रोजच्या जीवनात तणावग्रस्त असलेल्या शरीर आणि मनाला शांत आणि संतुलित राहण्यास प्रशिक्षित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : योग आपल्या रोजच्या जीवनात तणावग्रस्त असलेल्या शरीर आणि मनाला शांत आणि संतुलित राहण्यास प्रशिक्षित करण्यासाठी सहाय्यभूत ठरतो. आधुनिक युगात योग हे आत्म-नियंत्रण, व्यक्तिमत्त्व विकास आणि आपल्या आत्म्याच्या समृद्धीसाठी मार्गदर्शक आहे, असे जी. एम. एम.च्या योग विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि योग शास्त्रज्ञ डॉ. मृदुल चौधरी यांनी सांगितले.

चेंबूर येथील ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मृदुल चौधरी बोलत होत्या. कनिष्ठ महाविद्यालयाच्या आरोग्य व देखभाल समितीने पर्यवेक्षक जयश्री जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापन व शिक्षकेतर कर्मचारी सदस्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सत्र आयोजित केले होते. यावेळी ठाणे येथील घंटाळी मित्रमंडळाचे सहसचिव गणेश अंबिके यांनी योग प्रात्यक्षिके करून दाखवली. प्राचार्य डॉ. विद्यागौरी लेले यांनी योगाच्या समृद्ध परंपरेचे आणि आपल्या जीवनात असलेल्या योगाच्या नितांत आवश्यकतेचे वर्णन केले. समितीचे नंदकुमार गोसावी यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. दि. ह. महाजन यांनी आभार मानले.

............................................................