मेंदू, पाठीच्या कण्यासाठी आधुनिक क्लिनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 04:13 AM2017-08-05T04:13:46+5:302017-08-05T04:13:48+5:30
मुंबई : आरोग्यसेवेचे केंद्र म्हणून भारताचे जागतिक स्थान अधिक सक्षम करण्याची बांधिलकी जपत, उत्कृष्ट क्लिनिकल सेवांवर भर देत, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या भारतातील आघाडीच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने मेंदू व पाठीचा कणा यासाठी आधुनिक क्लिनिक सुरू केल्याची घोषणा केली आहे.
हे सर्वंकष क्लिनिक न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी व इंटरव्हेन्शनल न्यूरोरेडिओलॉजी यातील अद्ययावत सेवा उपलब्ध करणार आहे. त्यामध्ये न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, न्यूरोफिजिआॅलॉजी, एपिलेप्टॉलॉजी व इंटरव्हेन्शनल न्यूरो रेडिओलॉजी यासाठीच्या स्पेशलिस्टसह अंदाजे सतरा विशिष्ट क्षेत्रांतील आजार व्यवस्थापनाचा समावेश आहे. रुग्णांच्या सर्व सेवा पूर्ण करण्यासाठी व जागतिक दर्जाचे उपचार करण्यासाठी या केंद्राकडे डॉक्टरांची मोठी टीम आहे.
हे क्लिनिक दाखल करताना, या हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. राम नरेन यांनी सांगितले, एकाच ठिकाणी सर्वंकष व दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर आमचा नेहमीच भर राहिला आहे. हे क्लिनिक सुरू करणे हे रुग्णांना सर्वोत्तम दर्जाच्या सेवा देण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. मेंदू व पाठीचा कणा यांबाबतच्या प्रत्येक डिसआॅर्डरवर उपचार करणाºया डॉक्टरांच्या स्पेशलाइज्ड टीमद्वारे हे केंद्र न्यूरो उपचारांच्या बाबतीत देशातील एक आघाडीचे केंद्र म्हणून नाव कमाविणार आहे. गंभीर केसेसचे निदान वेगाने करणे व रुग्णांना तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देणे हे या केंद्राचे उद्दिष्ट असणार आहे.