Join us

आधुनिक युगात बैलगाडी होणार नामशेष

By admin | Published: June 13, 2014 11:49 PM

बळीराजाच्या सुरमय गाण्याच्या तालावर घुंगराच्या आवाजात दुबक्या चालीत चालणारी बैलगाडी आधुनिकीकरणाच्या युगात दुर्मिळ हात चालली आहे.

बोर्ली-मांडला : बळीराजाच्या सुरमय गाण्याच्या तालावर घुंगराच्या आवाजात दुबक्या चालीत चालणारी बैलगाडी आधुनिकीकरणाच्या युगात दुर्मिळ हात चालली आहे.पूर्वीच्या काळी दळणवळणाचे साधन म्हणून बैलगाडीस अनन्य साधारण महत्व होते. ज्याच्या घरी बैलगाडी व बैलजोडी तो श्रीमंत, असे मानले जात असे. परंतु या बैलगाडीला आधुनिकीकरणाच्या नावाचे ग्रहण लागले असून ही बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेणाने सारवलेले अंगण व त्या अंगणात रिकामी सोडलेली बैलगाडी अंगणाची पर्यायाने त्या घराची शोभा वाढवत होती. सध्या शेतामध्ये आधुनिक पध्दतीचा वाढलेला वापर कमी कष्टात जास्त उत्पादन घेण्याचा मानस, तरूण वर्गाचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलल्याने त्या बैलगाडीची जागा आता ट्रॅक्टर व पीवर ट्रेलर सारख्या यंत्रानी घेतली आहे. शेती करण्यासाठी शेतकरी राजा सुरवातीपासुनच बैलांचा वापर करत आला आहे. शेतातील कष्टांची कामे बैलांमार्फत केली जात असत. तसेच पिकांची मळणी करणे, वाहतुक करणे, यासाठी सरास बैलगाडीचाच वापर केला जात असे. काही शेतकऱ्यांच्या घरी पाच पाच बैलगाड्या पूर्वी असत.सुट्टीच्या काळात मुलेही मामाच्या गावाला जावून बैलगाडीवरून प्रवास करताना त्यांना आनंद होत असे. मात्र आता बैलगाडी हीच नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याने भविष्यात मुलांना बैलगाडी ही छायाचित्राद्वारे बघूनच त्याचा आनंद उपभोगता येईल. (वार्ताहर)