आधुनिक श्रावणबाळांना आईवडील नकोत !

By admin | Published: September 19, 2015 12:21 AM2015-09-19T00:21:04+5:302015-09-19T00:21:04+5:30

श्रावणबाळाने आंधळ््या आईवडिलांची अविरत सेवा केल्याचा इतिहास सर्वश्रुतच आहे. आजच्या आधुनिक युगात मात्र जन्मदात्या आईवडिलांना निराधार करणारे श्रावणबाळ जागोजागी आढळतात.

Modern Shravanabals do not want parents! | आधुनिक श्रावणबाळांना आईवडील नकोत !

आधुनिक श्रावणबाळांना आईवडील नकोत !

Next

- आविष्कार देसाई,  अलिबाग
श्रावणबाळाने आंधळ््या आईवडिलांची अविरत सेवा केल्याचा इतिहास सर्वश्रुतच आहे. आजच्या आधुनिक युगात मात्र जन्मदात्या आईवडिलांना निराधार करणारे श्रावणबाळ जागोजागी आढळतात. त्यामुळेच रायगड जिल्ह्यात १३ हजार ३२८ आईवडील सरकारच्या योजनेवर आपला उदरनिवार्ह करीत असल्याचे समोर आले आहे.
पूर्वी एकत्र कुटुंबव्यवस्था अस्तित्वात होती. त्यामुळे सुख, समृद्धी, आनंद अनुभवायला मिळत होता. कामाधंद्यामुळे, प्रॉपर्टीच्या वादामुळे एकत्र कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त झाली. काही कुटुंबांमध्ये भावाभावांनी तर चक्क आईवडिलांच्या वाटण्या केल्याचेही समोर आले आहे. शहरी भागामध्ये पसरलेले हे लोण आता ग्रामीण भागातही आले आहे.
आईवडिलांनमुळे आपण जग बघतो़ जे आईवडील लहानाचे मोठे करतात, शिक्षण देतात, त्याच आईवडिलांवर आता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. मुले सांभाळ करीत नसल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा आईवडिलांचा आधार बनण्यासाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना २०१० मध्ये सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये १३ हजार ३२८ निराधार वृृद्ध व्यक्तींना सरकारने प्रत्येकी ४०० आणि ६०० रुपयांचे निवृत्तीवेतन देऊ केले आहे. ही आकडेवारी एप्रिल ते जुलै २०१५ या कालावधीतील असून, त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी विभागाने सांगितले.
अलिबाग तालुक्यात निवृत्तीवेतन घेणाऱ्यांची संख्या ७४२ आहे. पेण ४४४, मुरुड ६६२, पनवेल १,५३१, उरण ३६०, कर्जत ९९५, खालापूर ६३१, माणगाव १२७२, रोहे ११२५, तळा ३१३, सुधागड ६९१, महाड १०३५, म्हसळा ४७४, पोलादपूर ४७७, श्रीवर्धन ५७६ अशी १३,३२८ निवृत्तीवेतनधारकांची संख्या आहे. यासाठी सरकारने ६० लाख १५,२०० रुपये देऊ केले आहेत.

वृद्धांची काळजी घेण्याची समाजाची मानसिकता कायम राहावी म्हणून सरकराने ‘आईवडील सांभाळ कायदा २०१०’ मध्ये केला आहे. नोकरीधंद्यानिमित्त स्थलांतराचे प्रमाण वाढल्याने आईवडील एकटे पडत आहेत. स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
-उल्का महाजन,
सामाजिक कार्यकर्त्या

Web Title: Modern Shravanabals do not want parents!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.