Join us

आधुनिक पद्धतीने कर निर्धारण

By admin | Published: April 04, 2015 10:41 PM

शहरातील बँका, बिग बाजार, मॉल, हॉटेल, धनधांडग्यांच्या मालमत्तेला नाममात्र मालमत्ताकर आकारला जात असल्याचे उघड झाले

सदानंद नाईक ल्ल उल्हासनगरशहरातील बँका, बिग बाजार, मॉल, हॉटेल, धनधांडग्यांच्या मालमत्तेला नाममात्र मालमत्ताकर आकारला जात असल्याचे उघड झाले असून मालमत्तेचे आधुनिक पद्धतीने सर्वेक्षण करून नव्याने करआकरणी करणार असल्याची माहिती विभागाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १ लाख ६६ हजारांपेक्षा जास्त मालमत्ता असून मालमत्तेची करआकारणी असमान असल्याने कोट्यवधींचे नुकसान होत आहे. सेनेचे नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांनी गेल्या महासभेत विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळील रिजन्सी संस्थेला नव्याने कर आकारणीऐवजी जुन्या दराने आकारणी केल्याचा प्रश्न उपस्थितीत करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.आमदार ज्योती कलानी यांनी असंख्य बहुमजली इमारतींना नाममात्र करआकारणीचा प्रश्न महासभेत उपस्थित करून पालिका आयुक्तांना याची यादी दिली होती. मात्र, अद्यापही मालमत्ता विभागाकडून कारवाई झाली नसून नवनवीन प्रकार उघडकीस येत असल्याने मालमत्ताकर विभाग वादात सापडला होता. कोट्यवधींचे घोटाळा प्रकरण गाजले असून तत्कालीन उपायुक्तासह ६ ते ७ जणांवर कारवाई होऊन ते निलंबित झाले आहेत.कल्याण शहराजवळील लष्करी छावणीत देशाच्या फाळणीवेळी पाकिस्तान, सिंध प्रांतांतील बहुसंख्य सिंधी समाजासह इतर समाजाला बॅरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या ९ लाखांपेक्षा जास्त असून १ लाख ६६ हजारांवर मालमत्ताधारकांची संख्या झाली आहे. त्यापैकी ३७ हजार ८९५ मालमत्ताधारक वाणिज्य क्षेत्रासी निगडित आहेत. मालमत्तेचे कर निर्धारण वेळोवेळी होत नसल्याने ५० टककयांपेक्षा जास्त इमारतींना जुन्याच दराने नाममात्र करआकारणी केली जात आहे.४महापालिकेने राजकीय हस्तक्षेप झुगारून मालमत्तेचे आधुनिक पद्धतीने व नव्याने कर निर्धारण केल्यास दुप्पट मालमत्ताकर उत्पन्न वाढणार असल्याचा विश्वास राजेंद्रसिंग भुल्लर यांनी व्यक्त केला आहे. झोपडपट्टीतील घराची दुरुस्ती केली तरी त्याचे नव्याने कर निर्धारण केले जाते. तसेच त्यांना अवैध कामाच्या यादीत टाकून दुप्पट नव्हेतर तिप्पट मालमत्ताकर आकारणी केली जात असल्याने झोपडपट्टीधारकांत असंतोष निर्माण झाला आहे. यापेक्षा जुन्या मालमत्तेचे नव्याने कर निर्धारण केल्यास कोट्यवधींचे उत्पन्न वाढण्याचा विश्वास भुल्लर यांनी व्यक्त केला आहे.