मध्य रेल्वेवर आधुनिक शौचालय, कुर्ला स्थानकासह कल्याण-डोंबिवली स्थानकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:26 AM2017-11-29T05:26:39+5:302017-11-29T05:27:06+5:30

मात्र शुल्क आकारणार आधुनिक स्वच्छतागृहांतर्गत मोकळी हवा, प्रशस्त जागा, भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीची स्वच्छता गृह, टेबल आणि आरसा या गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे.

 Modern toilets on Central Railway, Kalyan-Dombivali stations including Kurla station | मध्य रेल्वेवर आधुनिक शौचालय, कुर्ला स्थानकासह कल्याण-डोंबिवली स्थानकांचा समावेश

मध्य रेल्वेवर आधुनिक शौचालय, कुर्ला स्थानकासह कल्याण-डोंबिवली स्थानकांचा समावेश

Next

  मात्र शुल्क आकारणार आधुनिक स्वच्छतागृहांतर्गत मोकळी हवा, प्रशस्त जागा, भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीची स्वच्छता गृह, टेबल आणि आरसा या गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात डोंबिवली आणि कुर्ला स्वच्छतागृहाचे लोकार्पण करण्यात येईल. प्रवाशांकडून नाममात्र शुल्क भरुन आधुनिक स्वच्छतागृहाची सुविधा वापरता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसपंर्क विभागाने दिली.


मुंबई : मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी आधुनिक सुविधेचे शौचालय सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानूसार कल्याण स्थानकातील शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. कुर्ला आणि डोंबिवली स्थानकातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात या शौचालयांचे लोकार्पण होणार आहे. या शौचालयांमध्ये दिव्यांगासाठी विशेष स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
स्वच्छ भारत उपक्रमांतर्गत मध्य रेल्वेवर स्वच्छते विषयक विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहे. कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक १ वर नवीन शौचालय उभारण्यात आले आहे. यात पुरुषांसाठी सहा, महिलांसाठी २ आणि दिव्यांगासाठी एक आसन असणार आहे. शिवाय वॉश बेसिन आणि टेबल देखील 
या स्वच्छता गृहात उभारण्यात 
आले आहेत. 
डोंबिवली स्थानकात फलाट क्रमांक ५ वर देखील अशा पद्धतीचे शौचालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यात पुरुषांसाठी ४ आणि महिलांसाठी ३ आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर दिव्यांगासाठी एक विशेष कक्ष तयार करण्यात येणार आहेत.  कुर्ला स्थानकात नवीन आरक्षण केंद्राजवळ आधुनिक स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. कल्याण येथील स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले असून लवकरच याचे लोकार्पण होणार आहे. तर डोंबिवली आणि कुर्ला येथील स्वच्छता गृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

 

Web Title:  Modern toilets on Central Railway, Kalyan-Dombivali stations including Kurla station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.