Join us

मुंबईतील पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 3:50 AM

मुंबईतील पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सीस्टिम इंटिग्रेशन (सीएसआय) प्रणाली राबविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीपीओ, तसेच दक्षिण मुंबईतील उर्वरित १८ पोस्ट कार्यालयांमध्येही लवकरच ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील पोस्टाचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात आहे.

मुंबई : मुंबईतील पोस्ट कार्यालयांमध्ये कोअर सीस्टिम इंटिग्रेशन (सीएसआय) प्रणाली राबविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जीपीओ, तसेच दक्षिण मुंबईतील उर्वरित १८ पोस्ट कार्यालयांमध्येही लवकरच ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील पोस्टाचे आधुनिकीकरण अंतिम टप्प्यात आहे.मुंबईतील २३१ पोस्ट कार्यालयांपैकी बहुसंख्य ठिकाणी सीएसआय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. चेंबूर, तसेच बोरीवली येथील पोस्ट कार्यालयांमध्येदेखील मंगळवारी या प्रणालीची सुरुवात करण्यात आली. लवकरच जीपीओ, तसेच दक्षिण मुंबईतील १८ पोस्ट कार्यालयांमध्येही ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे.सीएसआय प्रणालीमुळे स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट यांना शोधणे व संबंधित पत्र नेमके कुठपर्यंत गेले आहे, हे समजणे शक्य होणारआहे. ग्राहकांना याबाबतचा एसएमएस पाठविण्यात येईल. पुढील टप्प्यात ग्राहकांना कोणत्या पोस्टमनद्वारे पत्र, वस्तू घरी पोहोचविण्यात येणार आहे, त्याचा मोबाइल क्रमांक आदी माहितीदेखील एसएमएसद्वारे ग्राहकांना पाठविण्यात येणार आहे.सीएसआय प्रणालीचा फायदाकोअर सीस्टिम इंटिग्रेशन (सीएसआय) म्हणजेच सीएसआय प्रणालीमुळे पोस्टाचे कामकाज अधिक वेगाने होऊन ग्राहकांना तत्पर सेवा मिळेल.देशातील सर्व पोस्ट कार्यालये आॅनलाइन जोडली जातील. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध होऊन पोस्टाचे कामकाज अधिक पारदर्शी होण्यास मदत होईल.

टॅग्स :मुंबई