Join us

मोदी मला घाबरतात म्हणूनच सातत्यानं सोलापुरात, सुशीलकुमार शिंदेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 6:58 AM

सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा.

सोलापूर : सीबीआयचे प्रमुख अलोक वर्मा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी येथे केली.

मोदी विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी बुधवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सायंकाळी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदी सोलापुरात आले व त्यांनी अनेक पुड्या सोडल्या. शिंदे यांनी सोलापुरात काहीच केले नाही, असा आरोप करून त्यांनी लोकांना गाजरं दाखविली. आता पुन्हा गाजरांना पाला फोडण्यासाठी ते सोलापुरात येत आहेत. साडेचार वर्षे त्यांनी नागरिकांना अशाच थापा मारल्या.ते मला घाबरतातलोकसभेत मी सभागृहनेता असताना मोदी यांनी माझ्यावर अनेक वेळा टीका केली. एकाच व्यक्तीला किती पदे देता असे प्रश्न उपस्थित केले. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा सोलापुरातून पुड्या सोडणार आहेत. कदाचित मोदी यांना माझी भीती वाटत असावी, म्हणून त्यांना सारखे सोलापूर दिसत असावं, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :सुशिलकुमार शिंदेनरेंद्र मोदीसोलापूर