Join us

'मोदी अन् अमित शहाची टोळी निवडणूक हरेल, तेव्हाच आमचं सूतक संपेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 5:45 PM

हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल,

मुंबई - भाजपाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद ठिकठिकाणी उमटत आहे. सर्व स्तरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याचा मनसेनंही समाचार घेतला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करु, मोदी आणि अमित शहाची टोळी निवडणूक हारेल, तेव्हाच आमचं सूतक संपेल, असे म्हटले आहे.  

हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला, असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. मनसेने आपल्या मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन अमेय खोपकर यांची पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अमेय खोपकर यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

मुक्ताफळ म्हणावं की गटारगंगा ? स्वत:ला कधी साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे. आमच्या करकरेसाहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपची देशभक्ती कशी असते हे दाखवून दिलंय. याचा नुसता निषेध करुन भागणार नाही, जेव्हा मोदी-शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आमचं सूतक संपेल, अशी तीव्र प्रतिक्रिया मनसेच्या खोपकर यांनी दिली आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापू लागले असताना साध्वी यांच्या विधानाचा आयपीएस असोसिएशने ट्विट करत निषेध केला आहे.  भोपाळ लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहच्या विरोधात सर्व स्तरातून निषेध केला जातोय. तर, संभाजी ब्रिगेडनेही तीव्र प्रतिक्रिया देत साध्वींची जीभ  कापली पाहिजे असे म्हटलंय.

 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या, वाचा त्यांच्याच भाषेत....."वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा.""ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए.""मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."

टॅग्स :राज ठाकरेमनसेसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरनिवडणूकनरेंद्र मोदीअमित शहाशहीद