Join us

मोदींनी विचारलं, 'काय बोलू?'...'सवा सौ करोड' देशवासीयांचे 'एक सौ एक' सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 2:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणासाठी नागरिकांनाकडून सूचना मागविल्या आहेत. लाल किल्ल्यावरुन भाषण करताना मी काय बोलू ? असा प्रश्न मोदींनी विचारला होता. त्यावर, सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणासाठी नागरिकांनाकडून सूचना मागविल्या आहेत. लाल किल्ल्यावरुन भाषण करताना मी काय बोलू ? असा प्रश्न मोदींनी विचारला होता. त्यावर, सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, बहुतांश प्रतिक्रिया या विनोदी आणि खिल्ली उडविणाऱ्या आहेत. तर काही नेटीझन्सने 15 लाख रुपये देणार होते, त्यावर बोला, असेही म्हटले आहे. 

स्वातंत्र्य दिनी भाषणामध्ये मी कोणत्या मुद्यांचा समावेश केला पाहिजे, असे विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सोशल मीडियावरद्वारे सव्वाशे कोटी भारतीयांना साद घातली होती. यातील काही सूचनांचा पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात समावेश करणार आहेत. नरेंद्र मोदी अॅपद्वारे नागरिक आपल्या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकतात. याव्यतिरिक्त MyGov.in वर एक खास पेज http://nbt.in/1Fy_Wa देखील बनवण्यात आले आहे. मात्र, मोदींच्या या सूचनेवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी मोदींच्या कार्याचे कौतूक केले आहे. तर काहींनी मोदींच्या प्रश्नावरुन खिल्ली उडवली आहे. 

प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 15 लाख देणार होते, त्याचे काय झाले?. त्यावर बोलणार का ? असा प्रश्न काही जणांनी मोदींना विचारला आहे. तर काहींनी 2014 चा जाहीरनामा वाचून दाखवा, असाच सल्ला मोदींना दिला आहे. तसेच पाकिस्तान, राम मंदिर, गांधी-नेहरु एवढे सोडून रोजगार, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, राफेल भ्रष्टाचार, 2 कोटी रोजगार याबाबत बोला, असाही सल्ला अनेक नेटीझन्सने मोदींना दिला आहे. तर अनेकांनी निरव मोदी, विजय मल्ल्या यांवर बोलण्याची सूचना मोदींना केली आहे. तर मोदींनी दिलेल्या MyGov.in या http://nbt.in/1Fy_Wa पेजवरही शेकडो कमेंट करुन प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर एका नागरिकांने चक्क प्रश्नांची यादीच मोदींपुढे ठेवली आहे.

सन्माननीय मोदीजी,

1. Education as धंदा कब तक चलने वाला हे

2. मेरे बाबू की कोई gaurantee नहि की ओ मुझे जिंदा मिलेगे या मुर्दा क्यू की ओ किसान हे,

1.प्रायवेट जॉब आसनी से मिल्ने के लिये सरकार क्या कर सकती हे?

3. और मिले तो जॉब की privacy क्यूनही मिलती भिकारी की तरह निकाल क्यू देते हे

4.आरक्षण के लिये देश मे दंगे कब तक चलने वाले हे? क्यूँ न इसे खतम कर दे

5. भेड बकरियो की तरह लोग जनरल की डिब्बो मे कब तक सफर करेंगे6. 2022 तक सबको घर 2018

टॅग्स :नरेंद्र मोदीस्वातंत्र्य दिनसोशल मीडिया