मोदी डार्इंगला सील
By admin | Published: March 8, 2017 01:58 AM2017-03-08T01:58:21+5:302017-03-08T01:58:21+5:30
कापडावर प्रक्रिया करणाऱ्या मोदी डार्इंगमध्ये आग विझविण्याचे साहित्य व सुविधा नसल्याने तसेच अग्निशमन दलाने सुचविलेल्या उपाययोजना न केल्यामुळे पालिका प्रशासनाने
भिवंडी : कापडावर प्रक्रिया करणाऱ्या मोदी डार्इंगमध्ये आग विझविण्याचे साहित्य व सुविधा नसल्याने तसेच अग्निशमन दलाने सुचविलेल्या उपाययोजना न केल्यामुळे पालिका प्रशासनाने मोदी डार्इंगला सोमवारी टाळे लावून सील केले.
प्रभाग समिती क्र. ४च्या कार्यक्षेत्रातील नवीन गौरीपाडा येथील मोदी डार्इंगला मागील आठवड्यात शुक्रवारी आग लागली. त्या वेळी डार्इंगमध्ये आग विझविण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने प्राथमिक उपाययोजना झाली नाही. परिणामी, आगीची भीषणता वाढली. त्यामुळे नागरीवस्तीत घबराट पसरली. या घटनेमुळे ही डार्इंग बंद करण्यासाठी नागरिकांचा दबाव वाढू लागला. काही नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. या घटनेची दखल घेत आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अग्निशमन दलाकडून माहिती घेतली असता २०१४ ते १६दरम्यान डार्इंगचे फायर आॅडिट केल्यानंतर त्यामध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना, आग प्रतिबंधक उपकरणे व साहित्य ठेवण्याची नोेटीस बजावूनही व्यवस्थापनाने कुठल्याही उपाययोजना अंमलात आणल्या नाहीत. त्यामुळे आयुक्त म्हसे यांनी कारवाई करून डार्इंगला सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सह प्रभाग अधिकारी सुनील भालेराव, अग्निशमन अधिकारी डी.एन. साळवी, पाणीपुरवठा अधिकारी एल.पी. गायकवाड यांनी डार्इंगला सील केले. (प्रतिनिधी)