मोदी सरकारच्या अच्छे दिनची जव्हारला ‘प्रथम पुण्यतिथी’

By admin | Published: May 26, 2015 10:56 PM2015-05-26T22:56:29+5:302015-05-26T22:56:29+5:30

जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रतिकात्मक ‘अच्छे दिन’ ची पहिली पुण्यतिथी समारोह आज पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला.

Modi government's first day of birth is 'first death anniversary' | मोदी सरकारच्या अच्छे दिनची जव्हारला ‘प्रथम पुण्यतिथी’

मोदी सरकारच्या अच्छे दिनची जव्हारला ‘प्रथम पुण्यतिथी’

Next

पालघर : जनतेचा वचनभंग करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रतिकात्मक ‘अच्छे दिन’ ची पहिली पुण्यतिथी समारोह आज पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरा करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली होती. त्यांनी पदग्रहण करून आज एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी दिलेली प्रमुख आश्वासने अद्यापही पूर्ण केलेली नाहीत. किंबहुना सदर आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांनी पावले सुद्धा टाकलेली नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये फसवणूकीची भावना निर्माण झाली असून १. पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करणे, २. जिवनावश्यक वस्तुची महागाई रोखणे, ३. दरवर्षी २.५ कोटी नोकऱ्या देणे, ४. विदेशातील काळा पैसा शंभर दिवसात परत आणणे. ५. प्रत्येक भारतियांच्या खात्यात १५ लाख रक्कम जमा करणे, ६. औषधे स्वस्त करणे, ७. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे, ८. दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करणे. ९. चीनला वठणीवर आणणे. १०. शेतीच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देणे इ. आश्वासने निवडणुकीपूर्वी दिलेली होती. त्यांची पूर्तता उशीराने का होईना पूर्ण करावीत यासाठी आज पालघर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ निदर्शने करून त्यांच्या आश्वासनाच्या बोर्डला हार, फुले, वाहून तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, चंद्रकांत पाटील, जिल्हाउपाध्यक्ष अरविंद क्षत्रीय, माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, निलेश राऊत, रियाज मुल्ला, रोशन पाटील इ. पदाधिकाऱ्यांनी त्यांची पुण्यतिथी समारोह कार्यक्रम पार पाडला. यावेळी तहसिलदारांना निवेदनही देण्यात आले.
(वार्ताहर)

पालघर तालुक्यातील सफाळे जवळील खर्डी गावातील १२२ हेक्टर सरकारी जमीन आघाडी सरकारने नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ कोस्टल पोलीसींग संस्थेसाठी ३० वर्षासाठी दिल्याने सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घातपाती कारवायांचा बिमोड करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण असताना मोदी सरकारने हा प्रकल्प गुजरातमधील द्वारकामध्ये हलविण्यावर शिक्कामोर्तब केल्याने आजच्या निदर्शनादरम्यान निषेध व्यक्त करण्यात आला.

Web Title: Modi government's first day of birth is 'first death anniversary'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.