Join us

राज ठाकरेंच्या पोलखोलनंतर मोदींची 'ती' जाहिरात फेसबुकवरुन गायब 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 8:02 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. काल मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी दाखवलेला चिले कुटुंबियांचा फोटो सध्या चर्चेचा विषय बनला आहे.  चिले कुटुंबियांचा फोटो फेसबुकच्या 'मोदी फॉर न्यू इंडिया' पेजवरुन हटविण्यात आला आहे. दरम्यान, ही जाहिरात आमची नाही, असा दावा करणाऱ्या भाजपाने हे पेज का हटविले, असा सवाल मनसेने केला आहे.

राज ठाकरेंनी सभेत बोलवलेल्या कुटुंबाबद्दल बोलतानाही भाजपा नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या जाहिरातीचा सरकारशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. कुणीतही मोदीप्रेमाने हे पेज सुरू केले असून त्याचा सरकारशी आणि भाजपाशी संबंध नाही. तसेच या फोटोवर हे लाभार्थी असे कुठेही लिहिलं नाही. कुणतरी तो फोटो काढून मोदी हे तो मुमकीन है.. असे लिहित त्या कुटुंबाचा फोटो जोडला. अर्थात, त्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय तो फोटो प्रसिद्ध करणे चुकीचे असल्याचेही विनोद तावडेंनी म्हटले. तसेच, राज ठाकरेंची ही स्टँडअप कॉमेडी, टुरुंग टॉकीज राज्यातील मतदानानंतरही असंच सुरू राहू द्या, त्यामुळे 23 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होईल, असेही तावडे यांनी म्हटले आहे. 

(मुकेश अंबानी विरोधात म्हणजेच मोदींची सत्ता जात असल्याचा संदेश - राज ठाकरे )

काल  राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे.  मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात राज ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले. उद्योगपती मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचे आवाहन करणे म्हणजेच मोदींची सत्ता जात आहे.  मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असाच संदेश आहे. आजपर्यंत एखाद्या उद्योगपतीने जाहीरपणे कोण्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केल्याचे मला तरी आठवत नाही, असेही राज ठाकरे  यांनी सांगितले. 

 

 

टॅग्स :राज ठाकरेभाजपामुंबईमुंबई दक्षिणलोकसभा निवडणूक