मोदींची मुलाखत ही तर 'फिक्स मॅच', जितेंद्र आव्हाडांची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 10:51 AM2019-01-02T10:51:27+5:302019-01-02T10:52:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मोदींनी अनेक बाबींवर चर्चा केली.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुलाखतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. क्रिकेट मॅचमध्ये फिक्सींग असतं, हे मी यापूर्वी ऐकलं होतं. पराभूत मानसिकतेनं मोदींनी दिलेली मुलाखत म्हणजे तरुणांच्या भाषेत सांगायचं झाल्यास सेटींग आहे. तर ही मुलाखत म्हणजे फिक्स मॅचच, असा घाणाघाती आरोप आव्हाड यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत, मोदींनी अनेक बाबींवर चर्चा केली. जीएसटी, राम मंदिर, नोटाबंदी, 5 राज्यातील निवडणुकांमध्ये झालेला पराभव, सबरीमला मंदिर प्रवेश यांसह अनेक विषयांवर मोदींनी भाष्य केलं. मात्र, मोदींच्या या मुलाखतीची विरोधकांकडून खिल्ली उडविण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेद्र आव्हाड यांनी मोदींनी ही मुलाखत फिक्स होती. तसेच आजच्या तरुणाईच्या भाषेत सांगायचं झाल्यास ही मुलाखत म्हणजे सेटिंग होती, असे आव्हाड म्हणाले. मोदींची मुलाखत ही पत्रकार परिषद नव्हती, ती मुलाखत सेटींग होती, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मोदींची मुलाखत म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थ्याकडून अगोदर प्रश्नपत्रिका सेक करणे असेच आहे, त्यामुळे परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवून विद्यार्थी निकालाचे सेलिब्रेशन करणार, अशीही खिल्ली आव्हाड यांनी उडवली आहे.
गेल्या साडेचार वर्षात एकही मुलाखत न देता ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिलेली ‘फिक्स’ मुलाखत मोदींच्या मानसिक पराभवाचे द्योतक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही,
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2019
देशातील मुख्य... https://t.co/U7ivmPzh03
लहानपणी एक मुलगा बॅट आणि बॉल घेऊन यायचा...
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2019
आणि आम्हांला क्रिकेट खेळायला लावायचा.
त्याला आवडेल त्याला बॉलींग करायला लावायचा.
बॅटींग मात्र तो स्वतःच करायचा. बॉल जोरात टाकला तरी ओरडायचा.
या गोष्टीचा आणि मोदींच्या आजच्या मुलाखतीचा काहीच संबध नाही.
Exam paper set by the student himself !!!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 1, 2019
Now celebrate the result of 100/100 marks !😂#ModiInterview#TheModiInterview#PMtoANI